पावसाळ्यात फर्निचर खराब होण्याची भिती वाटते? मग ‘हे’ 5 सोपे उपाय करा फॉलो

पावसाळा ऋतू सुरू झाला की आपण सर्वजण आपल्या आरोग्याची काळजी घेत असतो. तशीच घरातील फर्निचरची देखील विशेष काळजी घ्यावी लागते. कारण या दिवसांमध्ये वातावरणात आर्द्रतेमुळे फर्निचर खराब होते. तर आजच्या या लेखात आपण अशाच 5 सोपे प्रभावी उपाय सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही फर्निचर नीट ठेऊ शकाल.

पावसाळ्यात फर्निचर खराब होण्याची भिती वाटते? मग हे 5 सोपे उपाय करा फॉलो
| Edited By: | Updated on: Jul 02, 2025 | 6:53 PM

एकीकडे पावसाळा थंड वारा आणि रिमझिम पावसाने अनेकांच्या मनाला दिलासा देतो, तर दुसरीकडे हा ऋतू सुरू झाला की आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत असतो. कारण या दिवसांमध्ये अनेक हंगामी आजार होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर आरोग्याची काळजी घेत असताना आपण आपल्या घरातील लाकडी फर्निचरची देखील काळजी घ्यावी लागते, कारण या हंगामात वातावरणामध्ये प्रचंड दमटपणा व आर्द्रता असते त्यामुळे लाकडी फर्निचरमध्ये ओलसरपणा, बुरशी यासारख्या समस्या निर्माण होतात. ज्यामुळे या वस्तू लवकर खराब होतात. जर वेळीच आवश्यक खबरदारी घेतली नाही तर पावसाचा हा ओलावा तुमच्या महागड्या सोफा, कपाट, बेड आणि टेबलची स्थिती खराब करू शकतो.

साधारणपणे घरात ठेवलेल्या फर्निचरची उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात सहज काळजी घेता येते, परंतु पावसाळ्यात त्याचे संरक्षण करण्यासाठी काही विशेष उपाय करणे आवश्यक आहे. चांगली गोष्ट म्हणजे काही अतिशय सोप्या आणि प्रभावी घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या फर्निचरचे आर्द्रतेपासून संरक्षण करू शकता. तर या लेखात अशा 5 सोप्या प्रभावी टिप्स जाणून घेऊयात…

1. फर्निचरजवळ मीठ किंवा कोळशाच्या बॅग्स ठेवा

मीठ आणि कोळसा (चारकोल) हे ओलावा शोषून घेण्यासाठी सर्वोत्तम घरगुती उपाय आहेत. तुम्ही लहान कापडी पिशव्यामध्ये मीठ किंवा कोळसा भरू शकता आणि त्या फर्निचरच्या ड्रॉवर, शेल्फ आणि दारांच्या कोपऱ्यात ठेवा. अशाने या पिशव्या ओलावा शोषून घेतात आणि फर्निचर चांगले राहते.

2. वॉक्स पॉलिश किंवा वार्निश वापरा

पावसाळ्याआधी लाकडी फर्निचरवर वॉक्स पॉलिश किंवा वार्निश लावणे खूप फायदेशीर आहे. यामुळे लाकडावर एक संरक्षक आवरण तयार होते जे पाणी आणि ओलावा आत जाण्यापासून रोखते. यामुळे फर्निचर दीर्घकाळ चमकदार आणि सुरक्षित राहते.

3. फर्निचर भिंतीपासून थोडे दूर ठेवा

पावसाळ्यात आर्द्रतेमुळे भिंतीमध्ये ओलावा निर्माण होतात. ज्यामुळे फर्निचर खराब होण्याचा धोका वाढतो. अशावेळेस तुम्ही सोफा, बेड किंवा कपाट भिंतीपासून काही इंच अंतरावर पुढे सरकवून ठेवा. यामुळे हवेचा प्रवाह टिकून राहतो आणि फर्निचर खराब होत नाही.

4. सुगंधित कापूर किंवा नॅप्थालीन गोळे ठेवा

कापूर आणि नॅप्थालीन गोळे फर्निचरचे कीटक आणि बुरशीपासून संरक्षण करतातच, शिवाय ते घरातील आणि फर्निचर हे सुगंधित देखील ठेवतात. बुरशी आणि वास टाळण्यासाठी ते कपाट, ड्रॉवर तसेच जिथे जास्त सामान असते त्या जागांमध्ये ठेवा.

5. कोरडे कापड आणि व्हॅक्यूम वापरा

पावसाळ्यात आठवड्यातून 23 वेळा कोरड्या आणि स्वच्छ कापडाने फर्निचर पुसणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे व्हॅक्यूम क्लिनर असेल तर त्याद्वारे कोपरे आणि लहान जागा स्वच्छ करा जेणेकरून ओलावा जमा होणार नाही. लक्षात ठेवा की ओले कापड फर्निचरवर अजिबात वापरू नका.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)