मृत्यूनंतरही आपल्या शरीराचा हा अवयव 10 वर्षे जिवंत राहतो; जाणून आश्चर्य वाटेल

मृत्यूनंतरही शरीराला एक तर जाळले जाते किंवा पुरले जाते. पण हे बऱ्याच जणांना हे माहित नसेल की मृत्यूनंतरही आपल्या शरीराचे अनेक अवयव काही तास, काही दिवस अन् काही वर्ष जिवंत राहतातय. होय, एक अवयव तर तब्बल 10 वर्षे जिवंत राहतो. चला जाणून घेऊयात याबद्दल.

Mayuri Sajerao | Updated on: Jul 27, 2025 | 12:27 PM
1 / 6
जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा त्याचे शरीर जाळले जाते किंवा पुरले जाते . अशा परिस्थितीत, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही काही अवयव असे असतात जे काही तास जिवंत राहतात . याशिवाय, काही अवयव असे असतात जे मृत्यूनंतर काही वर्षे जिवंत राहतात. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊया .

2 / 6
 डोळे :   एकदा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की, त्याच्या शरीरातील अनेक अवयव काम करणे थांबवतात . जसे त्या व्यक्तीचे हृदय धडधडणं थांबतं आणि त्याच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा देखील थांबतो . मात्र तरी देखील यावेळी काही अवयव जिवंत राहतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचा अवयव डोळे समाविष्ट आहे. एखाद्या व्यक्तीचे डोळे त्याच्या मृत्यूनंतर 6 ते 8 तास जिवंत राहतात . तथापि, जर एखाद्या व्यक्तीने डोळे दान केले असतील तर त्याच्या मृत्यूनंतर 6 तासांच्या आत त्याचे डोळे काढून घेणे आवश्यक असते.

3 / 6
 मानवी हाडे आणि त्वचा :  मृत्यूनंतर मानवी हाडे किती काळ सुरक्षित राहतात माहितीये? मानवी हाडे आणि आपली त्वचा सुमारे 5 वर्षे जिवंत ठेवता येते.

4 / 6
  केस आणि नखं :  माणसाच्या मृत्यूनंतर शरिरावरील केस आणि नखे देखील जिवंत असतात. मृत्यूनंचर ती तब्बल 6 तास जिवंत राहतात.

5 / 6
मृत्यूनंतर हृदय आणि मूत्रपिंड किती तास जिवंत असतात :  एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याच्या डोळ्यांव्यतिरिक्त, त्याचे मूत्रपिंड , हृदय आणि यकृत देखील प्रत्यारोपित केले जातात . मृत्यूनंतर या अवयवांच्या पेशी कार्यरत राहतात. उदाहरणार्थ, व्यक्तीचे हृदय त्याच्या मृत्यूनंतर 4 ते 6 तासांच्या आत दुसऱ्या रुग्णात प्रत्यारोपित केले जाऊ शकते ते तेवढ्या काळ जिवंत असते.  तसेच व्यक्तीचे मूत्रपिंड 72 तास आणि यकृत 8 ते 12 तास जिवंत राहते

6 / 6
मृत्यूनंतर हा अवयव 10 वर्षे जिवंत राहतो :  एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शरिराचा अजून एक भाग किंवा अवयव चक्क 10 वर्षं जिवंत राहतो. हा अवयव आहे हृदयाला चालवणारं 'हार्ट वॉल्व' म्हणजे झडप असं आहे. ते 10 वर्षं जिवंत ठेवता येतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us