AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lata Mangeshkar Music Academy Project: भूमिपूजनाला मंगेशकर कुटुंबीयांची उपस्थिती, संगीत विद्यालयाचं स्वप्नही मोठं; पण भाजपच्या एका निर्णयाने संपूर्ण प्रकल्पच रद्द!

Lata Mangeshkar Music Academy News: मिरा-भाईंदर शहरातील भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने उभारण्यात येणारं संगीत विद्यालय रद्द केलं आहे. त्या जागी महापौर निवास उभारण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला आहे.

Lata Mangeshkar Music Academy Project: भूमिपूजनाला मंगेशकर कुटुंबीयांची उपस्थिती, संगीत विद्यालयाचं स्वप्नही मोठं; पण भाजपच्या एका निर्णयाने संपूर्ण प्रकल्पच रद्द!
Mira-Bhayandar Scraps Lata Mangeshkar Music Academy Project
| Updated on: Oct 31, 2026 | 5:39 PM
Share

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ मीरा रोड येथे संगीत शाळा स्थापन करण्याचे स्वप्न भंगले आहे. कारण सत्ताधारी भाजपने ती इमारत महापौरांच्या निवासस्थानात रूपांतरित करण्याची योजना आखली आहे. संगीत शाळेचे महापौरांच्या निवासस्थानात रूपांतर करण्याचा ठराव नागरी समितीने मंजूर केला. अंदाजे 25 कोटी रुपये खर्चाने संगीत शाळेचे बांधकाम सुरू आहे. त्यापैकी जवळपास 70 टक्के काम आधीच पूर्ण झाले आहे. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. तर विरोधक भाजपवर टीका करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत या इमारतीचे महापौरांच्या निवासस्थानात रूपांतर करण्यास मंजुरी देणारा ठराव मंजूर करण्यात आला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. हा निर्णय संगीत आणि कलाप्रेमींचा अपमान असून मंगेशकर कुटुंबाच्या भावना दुखावणारा आहे, असे म्हटले आहे. मिरा-भाईंदर शहरातील भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने उभारण्यात येणारं संगीत विद्यालय रद्द करून त्या जागी महापौर निवास उभारण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला.

या निर्णयामुळे शहरात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली जातं आहे. तीन वर्षांपूर्वी त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंगेशकर कुटुंबियांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. संगीत विद्यालयासाठी 25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. या वास्तूचे काम 70 टक्के पूर्ण झाले असताना हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय का घेण्यात आला? भाजपने मंगेशकर कुटुंबियांचा अपमान केल्याचा आरोप विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.

त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात १७ जून २०२२ रोजी या प्रकल्पासाठी ५ कोटी रुपयांची प्राथमिक तरतूद मंजूर करण्यात आली होती. मात्र आता भाजपने वेगळाच निर्णय घेतला आहे. भाजपच्या निर्णयाचे समर्थन करताना उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील म्हणाले की, सध्याच्या महापौर निवासस्थानात जागा मर्यादित असल्याने प्रस्तावित संगीत शाळेच्या इमारतीचे महापौर भवनात रूपांतर करणे आवश्यक आहे.

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा