Chanakya Niti : पत्नीच्या अशा बोलण्यावर पतीने लगेच विश्वास ठेवू नये, चाणक्य यांनी दिलेला मोठा सल्ला

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्या नीतिमध्ये अनेक असे सल्ले दिले आहेत, जे कुटुंबासाठी फार महत्त्वाचे आहे. चाणक्य यांनी असं देखील सांगितलं आहे की, पतीने कधीच पत्नीच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवून निर्णय घेऊ नये... तर जाणून घ्या चाणक्य यांनी काय सांगितलं आहे.

Chanakya Niti : पत्नीच्या अशा बोलण्यावर पतीने लगेच विश्वास ठेवू नये, चाणक्य यांनी दिलेला मोठा सल्ला
| Updated on: Nov 08, 2026 | 2:21 PM

Chanakya Niti : कोणत्या कुटुंबात वाद होत नाहीत, असं कोणतंच कुटुंब नाही. सासू – सूनेमध्ये तर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाद होत असतात. याच कारणामुळे घरातील वातावराण देखील खराब होतं आणि दोघींच्या वादात पुरुषांचं मरण होतं… तर चाणक्य सांगतात, पतीने कधीच पत्नीच्या बोलण्यावरुन निर्णय घेऊ नये. आचार्य चाणक्य यांनी म्हटलं आहे की, जर कुटुंबात शांतता आणि सलोखा टिकवायचा असेल आणि नातेसंबंध टिकवायचे असतील, तर पतीने यापैकी काही गोष्टी न ऐकणेच उत्तम असेल. त्यांच्या मते, काही निर्णय भावनिकतेने नव्हे, तर बुद्धिमत्तेने घेतले पाहिजेत. तरच कुटुंबात शांतता नांदू शकते. तर जाणून घ्या चाणक्य यांनी काय सांगितलं आहे.

कुटुंबापासून वेगळे राहण्याचा निर्णय : चाणक्याच्या मते, जर पत्नी कुटुंबापासून वेगळे राहण्याचा आग्रह धरत असेल, तर पतीने त्याबाबत घाईघाईने निर्णय घेऊन वेगळे घर बांधू नये. त्याने आधी समस्या समजून घेऊन संवादातून ती सोडवण्याचा प्रयत्न करावा. जर असं करुन देखील प्रश्न आणि वाद सुटत नसतील तर, वेगळं राहण्याचा निर्णय घ्यावा…

Loading...

मालमत्तेसंदर्भातील दबावाला बळी पडू नका : चाणक्य म्हणतात की, जर पत्नीने पतीची मालमत्ता किंवा कुटुंबातील इतर सदस्यांची मालमत्ता स्वतःच्या नावावर हस्तांतरित करण्याचा आग्रह धरला, तर पतीने त्याला कधीही संमती देऊ नये. अशा निर्णयामुळे अनेकदा नातेसंबंधात आणि कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात.

एवढंच नाही तर, जर तुम्हाला इजा पोहोचवण्यास कोणाला सांगितले जात असेल , तर तुम्ही त्याला संमती देऊ नये. जर पत्नी दुसऱ्या व्यक्तीला कोणासमोर अपमान करण्यास, इजा पोहोचवण्यास किंवा भांडण्यास सांगत असेल, तर पतीने कोणत्याही कारणास्तव याला संमती देऊ नये किंवा या बाबतीत तिचं समर्थन करू नये. कारण अशा कृतींचा तुमच्या दोघांच्याही नात्यावर आणि सामाजिक प्रतिष्ठेवर परिणाम होऊ शकतो.

पत्नीला विनाकारण खर्च करू देऊ नये: आचार्य चाणक्य यांनी असा सल्ला दिला आहे की, जर पत्नीने पतीला अनावश्यक गोष्टींवर खर्च करण्यास सांगितलं, तर पतीने कोणत्याही कारणास्तव त्याला संमती देऊ नये. खर्च करण्याऐवजी, शक्य तितकी बचत करावी आणि भविष्यातील सुरक्षिततेसाठी आर्थिक संतुलन राखावे.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us