AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Laxmi Pujan 2026 Wishes: आपल्या प्रिजनांना मराठीत पाठवा दिवाळी आणि लक्ष्मी पूजनाच्या खास शुभेच्छा! पहा खास संदेश

Laxmi Pujan 2026 Wishes in Marathi : आजच्या या शुभ दिनी तुम्ही तुमच्या प्रियजनांना लक्ष्मी पूजनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही खास संदेश घेऊन आलो आहोत. हे संदेश तुम्ही सोशल मीडियावर टाकण्यासाठीही वापरू शकता.

Laxmi Pujan 2026 Wishes: आपल्या प्रिजनांना मराठीत पाठवा दिवाळी आणि लक्ष्मी पूजनाच्या खास शुभेच्छा! पहा खास संदेश
Laxmi Pujan 2026 Wishes in Marathi
| Updated on: Nov 08, 2026 | 2:21 PM
Share

Diwali and Laxmi Pujan 2026 Wishes and Status in Marathi: आज, ८ नोहेंबर रोजी देशभरात दिवाळी साजरी केली जात आहे. याशिवाय आजच्याच दिवशी लक्ष्मी पूजनही आले आहे. लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा मुख्य आणि तिसरा दिवस असतो. हा सण कार्तिक महिन्यातील ‘अमावस्या’ या तिथीला साजरा केला जातो. या रात्री धन, ऐश्वर्य आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि ज्या घरांमध्ये स्वच्छता, प्रकाश आणि भक्ती असते, तिथे ती प्रवेश करते अशी धार्मिक श्रद्धा आहे. आजच्या या शुभ दिनी तुम्ही तुमच्या प्रियजनांना लक्ष्मी पूजनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही खास संदेश घेऊन आलो आहोत. तुम्ही हे संदेश सोशल मीडियावर ते स्टेट्स अशा कोणताही ठिकाणी सहज वापरू शकता.

लक्ष्मीपूजन रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ चे अत्यंत शुभ आणि फलदायी मुहूर्त खालीलप्रमाणे आहेत. तुमच्या सोयीनुसार तुम्ही घरातील किंवा दुकानातील पूजा करू शकता.

१. प्रदोष काळ मुहूर्त (घरी लक्ष्मीपूजनासाठी सर्वोत्तम)

घरगुती पूजेसाठी संध्याकाळची वेळ आणि वृषभ लग्न (स्थिर लग्न) सर्वोत्तम मानले जाते, ज्यामुळे लक्ष्मी घरात स्थिर राहते. • पूजेचा मुख्य शुभ मुहूर्त: संध्याकाळी ५:५४ ते रात्री ७:५०

• प्रदोष काळ वेळ: संध्याकाळी ५:३१ ते रात्री ८:०९

महाराष्ट्रातील प्रमुख शहरे आणि वेळा

• मुंबई: संध्याकाळी ६:२७ ते रात्री ८:२७

• पुणे: संध्याकाळी ६:२४ ते रात्री ८:२४

• नागपूर: संध्याकाळी ५:५२ ते रात्री ७:५१

• नाशिक: संध्याकाळी ६:२२ ते रात्री ८:२३

२. चौघडियानुसार इतर शुभ मुहूर्त (दिवसा आणि रात्री)

जर तुम्हाला वरील वेळेत पूजा करणे शक्य नसेल, तर तुम्ही चौघडिया मुहूर्त पाहू शकता.

• दुपारचा शुभ मुहूर्त (चर, लाभ, अमृत): दुपारी ०१:२६ ते दुपारी ०२:५४ (दुकान किंवा ऑफिसच्या पूजेसाठी उत्तम)

• संध्याकाळचा शुभ मुहूर्त (शुभ, अमृत, चर): संध्याकाळी ०५:४५ ते रात्री ०९:००

प्रियजनांना पाठवा हे खास शुभेच्छा संदेश

• घरात लक्ष्मीचा वास असो, जीवनात आनंदाचा प्रकाश असो! तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

• लक्ष्मीच्या पावलांनी तुमच्या घरात सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि धनसंपदा नांदो. शुभ लक्ष्मीपूजन!

• महालक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होवोत आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होवोत. लक्ष्मीपूजनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

• घरात लक्ष्मीचा निवास, अंगणी दिव्यांची आरास… लक्ष्मीपूजनाच्या पावन पर्वावर लाभो सुख-समाधानाचा ध्यास. शुभ दीपावली!

• महालक्ष्मीचे करुनी पूजन, लावा दीप अंगणी… धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी!

• धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी… या अष्टलक्ष्मींची कृपा तुमच्यावर सदैव राहो. लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

• लक्ष्मी आली सोनपावलांनी, उधळण झाली सौख्याची, धन-धान्यांच्या राशी भरल्या, घरी नांदू दे सुख-समृद्धी!

• दारात रांगोळीचे सुंदर रंग उधळत राहो, सोनेरी दिव्यांनी यशाच्या वाटा उजळत राहो, महालक्ष्मीच्या कृपेने घरात सुख-शांती वाढो!

• दिव्यांच्या तेजाने दूर होवो मनाचा अंधार, सुख-समृद्धीने भरून जावो तुमचा संपूर्ण संसार. शुभ लक्ष्मीपूजन!

Follow Us
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत,
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील नेत्याच...
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
भव्य रांगोळी, झगमग रोषणाई... दिवाळी पहाटचा उत्साह; पहा सुंदर व्हिडीओ..
Diwali 2026 : भव्य रांगोळी, झगमग रोषणाई... दिवाळी पहाटचा उत्साह; पहा सुंदर व्हिडीओ...