
नवी दिल्ली – बिर्याणी (biryani) हा पदार्थ म्हटला की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं, संपूर्ण जगात बहुतांश नागरिकांना हा पदार्थ आवडतो. हा ऑलटाइम फेव्हरिट पदार्थ (all time favorite food) असून अनेक लोकांना ती खायला खूप आवडते. पण चविष्ट अशी ही बिर्याणी आरोग्यासाठी चांगली आहे असं लोकं मानत नाहीत. पण बिर्याणी ही हेल्दी ठरू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का? आफ्रिकन जर्नल ऑफ फूड सायन्स अँड टेक्नोलॉजीच्या रिपोर्टमध्ये (report) बिर्याणीबद्दल मोठा खुलासा करण्यात आला आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
हैदराबादी बिर्याणी आहे हेल्दी
हैदराबादी बिर्याणी भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहे आणि ती बर्याच प्रमाणात आरोग्यदायी असल्याचे संशोधनात म्हटले आहे. संशोधनानुसार यामध्ये तांदूळ, मांस आणि तेल यांसारख्या घटकांचा वापर केला जातो, ज्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. अभ्यासानुसार, हैदराबादी बिर्याणीमध्ये अंडी, मांस आणि भाज्यांचा वापर केल्याने ती हेल्दी होऊ शकते.
हैदराबादी बिर्याणीचे फायदे
अँटी-ऑक्सीडेंटस (Antioxidants): बिर्याणीमध्ये हळद, जिरे, काळी मिरी, आले, लसूण आणि केशर घालतात. या सर्व गोष्टी अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण असतात ज्यामुळे शरीर निरोगी होते. हे अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीराचे अवयव निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
पचन (Better Digestion): बिर्याणीमध्ये हळद आणि काळी मिरी घातली जाते आणि हे दोन्ही मसाले आपली पचनक्रिया सुधारण्याचे काम करतात. त्यांच्यातील अँटीऑक्सिडंट्स शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करतात.
व्हिटॅमिन (Vitamin rich food): कांदा, आलं आणि लसूण घालून डिश चविष्ट बनवता येते, परंतु या गोष्टीही आपल्याला निरोगी बनवू शकतात. यामध्ये सल्फर कंपाऊंड्, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन सी आढळतात. तुम्हाला माहित आहे का की बिर्याणीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स हे यकृताचे आरोग्य राखण्यासाठी देखील उपयुक्त आहेत.