डोळ्यांखालील डार्क सर्कलमुळे त्रस्त आहात? मग, या टिप्स नक्की फाॅलो करा

| Updated on: May 26, 2021 | 3:23 PM

आपले डोळे सुंदर आणि तजेलदार असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते.

डोळ्यांखालील डार्क सर्कलमुळे त्रस्त आहात? मग, या टिप्स नक्की फाॅलो करा
डार्क सर्कल
Follow us on

मुंबई : आपले डोळे सुंदर आणि तजेलदार असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, बदलेल्या जीवनशैलीमुळे कमी झोप आणि ताणतणावामुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल येण्याचे प्रमाणात वाढले आहे. आपण कितीही काळजी घेतली तरी, कामाच्या ताणामुळे आणि झोपेच्या वेळेमुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल येतात. यामुळे आपण आजारी असल्या सारखे दिसतो. आपण देखील या समस्येने ग्रस्त आहात, तर या घरगुती उपायांचा नक्की अवलंब करा. (If you are suffering from dark circles under the eyes then follow these tips)

डार्क सर्कलची समस्या दूर करण्याासाठी आपल्याला एक काकडी आणि दही लागेल. सर्वात प्रथम काकडी बारीक करून घ्या आणि त्यामध्ये दही मिक्स करा. ही पेस्ट व्यवस्थित मिसळा आणि डोळ्याना लावा. ही पेस्ट डोळ्याला लावण्यामुळे डोळे थंड होतात. या पेस्टमुळे डार्क सर्कल दूर होण्यास मदत होते. ही पेस्ट आपण साधारण आठवड्यातून दोन ते तीन वेळा डोळ्याना लावली पाहिजे. सतत एक महिना ही पेस्ट डोळ्यांना लावली तर डार्क सर्कल जाण्यास मदत होते.

डार्क सर्कलपासून मुक्त होण्यासाठी डोळ्यावर काकडीचे काप ठेवा. काकडीत अँटीऑक्सिडेंट असतात. त्याचा थंड प्रभाव आपल्याला डोळ्यांना शीतलता देईल, तसेच डोळे डार्क सर्कलपासून मुक्त होतील. ज्या वस्तू थंड आहेत, त्या डार्क सर्कल कमी करण्यात लाभदायी ठरतात. आपण ही युक्ती थंड चमच्याच्या सहाय्याने देखील करू शकता. परंतु, आपण वापरलेल्या टी बॅग गोठवून ही टीप करून पाहू शकता. या टी बॅग आयमास्क प्रमाणे 15 मिनिटे डोळ्यांवर ठेवू शकता.

‘व्हिटामिन ई’ मुरुमे आणि डार्क सर्कल कमी करण्यात मदत करते. तसेच यामुळे आपला त्वचेचा टोन चांगला राहतो. डार्क सर्कल कमी करण्यासाठी व्हिटामिन ईच्या तेलात कोरफड जेल मिसळावे. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे तेल आपण डोळ्यांभोवती लावू शकता. दररोज 8 तास झोप घ्या. तसेच नेहमी सरळ रेषेत झोपा. पोटावर किंवा एका कुशीवर झोपल्यामुळे लिम्फॅटिक अॅसिड जमा होते आणि आपला चेहरा फुगतो.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(If you are suffering from dark circles under the eyes then follow these tips)