Father’s Day: घरापासून दूर असाल तर अशा प्रकारे साजरा करा ‘फादर्स डे’; तुमचं प्रेम पाहून वडिलही होतील भावूक!

वडिलांनी आपल्या आयुष्यासाठी जे काही केले आहे, त्याचे ऋण कोणताही एक दिवस साजरे करून फेडता येणार नाही, परंतु फादर्स डे साजरा करून आपण त्यांच्याशी आपले नाते नक्कीच घट्ट करू शकतो. येथे जाणून घ्या, फादर्स डे साठी खास कल्पना.

Father's Day: घरापासून दूर असाल तर अशा प्रकारे साजरा करा ‘फादर्स डे’; तुमचं प्रेम पाहून वडिलही होतील भावूक!
Father's DayImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 2:38 PM

फादर्स डे दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यावेळी 20 जून 2021 रोजी फादर्स डे (Father’s Day) आहे. वडिलांना समर्पित हा दिवस त्यांच्याबद्दल आपले प्रेम आणि आदर व्यक्त (express love and respect) करण्याचा मार्गआहे. बाप म्हणजे त्याग आणि समर्पणाचे उदाहरण. समाजातील सर्व वाईट गोष्टींपासून फक्त एक पिताच मुलाला वाचवतो. मुलांच्या गरजा पूर्ण (Meet the needs of children) करण्यासाठी वडील स्वतः धडपडत असतात. मुलाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी वडिलांना कणखर असावे लागते. वडिलांनी आपल्या आयुष्यासाठी कितीही केले असले तरी त्यांचे ऋण एक दिवस साजरे करून कधीच फेडता येणार नाही, पण फादर्स डे साजरा करून तुम्ही त्यांच्याशी असलेले नाते नक्कीच घट्ट करू शकता. तुम्ही तुमच्या कुटुंबापासून दूर राहत असाल, तरीही तुम्ही हा दिवस तुमच्या वडिलांसाठी खूप खास बनवू शकता. जाणून घ्या, अशाच काही कल्पना ज्यामुळे तुमचे वडील भावूक होतील आणि त्यांचे डोळे आनंदाने चमकतील.

1. हा दिवस वडिलांसाठी खास बनवण्यासाठी तुम्ही फादर्स डेच्या दिवशी सकाळी त्यांच्यासाठी पुष्पगुच्छ, शुभेच्छा आणि केक पाठवू शकता. त्यासाठी आधीच केक बुक करून ठेवावा. म्हणजे, वेळेवर कोणतीही अडचण येणार नाही. इंटरनेटवर यासाठी अनेक वेबसाइट्स आहेत.

2. तुम्ही तुमच्या वडीलांपासून दूर असल्यास, तुमच्या गावात राहणाऱया स्थानिक मित्रांची यासाठी मदत घ्या, मित्राला सांगून तुम्ही तुमच्या वडीलांपर्यंत फादर्स डे चे गीफ्ट पोहचवा आणि त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलून, फादर्स डे निमीत्त त्यांना शुभेच्छा द्या. तुम्ही फादर्स डेच्या दिवशी तुम्ही मित्रामार्फत वडिलांसाठी त्याच्या आवडत्या गोष्टी, मिठाई किंवा त्याला आवश्यक असलेली कोणतीही वस्तू पोहचू शकता.

हे सुद्धा वाचा

3. वडील आपल्यासाठी जे काही करतात ते आपल्याला जाणवते, पण आपण वडीलांना सांगू शकत नाही की, ते आपल्यासाठी किती खास आहेत. जर तुम्हाला लिहिण्याची आवड असेल तर वडिलांसाठी एखादी कविता लिहा आणि ती तुमच्या आवाजात रेकॉर्ड करा आणि त्यांना ऑडिओ पाठवा. जर तुम्ही ते करू शकत नसाल, तर तुम्हाला त्यांच्यासाठी जे काही वाटत असेल ते त्यांच्यासाठी मनापासून लिहून ठेवा आणि ते रेकॉर्ड करा आणि त्यांना फादर्स डेच्या दिवशी पाठवा. तुमच्या भावना ऐकून वडीलही खूप भावूक होतील.

4. तुम्हाला हवे असल्यास, तुमच्या आणि तुमच्या वडिलांसोबत लहानपणापासून ते आजपर्यंतच्या खास क्षणांचे फोटो गोळा करा आणि त्यांच्यासाठी एक व्हिडिओ तयार करा आणि या व्हिडिओमध्ये वडिलांसाठी काही कोट्स टाका आणि वडिलांना समर्पित एक चांगले गाणे टाका. हा व्हिडिओ पाहून त्याच्या आठवणी ताज्या होतील आणि डोळे पाणावतील.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.