TMKOC: “तिने पुन्हा आम्हाला मूर्खात काढलं”; दयाबेनविषयी जेठालाल असं का म्हणाला?

2017 मध्ये दिशाने ही मालिका सोडली होती. मात्र त्यानंतर ती पुन्हा परतलीच नाही. 2019 मध्ये ती फक्त पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी (Dilip Joshi) यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली.

TMKOC: तिने पुन्हा आम्हाला मूर्खात काढलं; दयाबेनविषयी जेठालाल असं का म्हणाला?
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jun 19, 2022 | 10:27 AM

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेत दयाबेनच्या भूमिकेत अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) परतणार नसल्याचं निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं. 2017 मध्ये दिशाने ही मालिका सोडली होती. मात्र त्यानंतर ती पुन्हा परतलीच नाही. 2019 मध्ये ती फक्त पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी (Dilip Joshi) यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. “दयाबेनने पुन्हा आम्हाला मूर्खात काढलं”, असं ते हसत म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून दिशाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. या प्रोमोमध्ये दयाबेनचं कमबॅक होणार असल्याचं कळतंय. मात्र ही दयाबेन दिशा वकानी नसेल, असं निर्माते असितकुमार मोदी यांनी स्पष्ट केलं.

“दया मालिकेत परतणार होती. मात्र तिने आम्हाला पुन्हा मूर्खात काढलं (हसतात). असित भाईंना नेमकं काय हवंय ते मला माहित नाही. जेठासाठी अच्छे दिन लवकरच येतील अशी आपण आशा करू. मी दिशासोबत जवळपास 10 वर्षे काम केलं. अगदी पहिल्या दिवसापासून आमची केमिस्ट्री जुळून आली होती. जुन्या एपिसोड्समध्ये तुम्हाला ते सहज पहायला मिळेल. दिशाचं काम खरंच खूप चांगलं आहे. फक्त सहकलाकारांनाच नाही तर प्रेक्षकांनाही तिचं अभिनय पाहायला आवडायचं”, असं दिलीप जोशी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

पहा मालिकेचा प्रोमो-

दिशाने 2017 मध्ये मालिकेतून ब्रेक घेतला होता. यादरम्यान तिने मुलीला जन्म दिला. स्तुती पाडिया असं तिच्या मुलीचं नाव आहे. मध्यंतरीच्या काळात ती मालिकेत परतणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण त्यादरम्यान ती पुन्हा गरोदर होती. दिशाने मुलाला जन्म दिला आणि त्याच्या संगोपनासाठी आपली सुट्टी वाढवून घेतली. आता मालिकेत ती परतणार नसल्याचं कळताच चाहत्यांनी निराशा व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें