Karan Johar: करण जोहरला धमकावून खंडणी मागण्याचा प्लॅन; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्याचा खुलासा

महाकाल हा पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्या प्रकरणातील संशयित शूटर संतोष जाधव याचा जवळचा सहकारी आहे आणि त्याला हत्येच्या कटाची चांगली माहिती होती, असं एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.

Karan Johar: करण जोहरला धमकावून खंडणी मागण्याचा प्लॅन; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्याचा खुलासा
Karan JoharImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 9:36 AM

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचं (Karan Johar) नाव हे खंडणीसाठी (extortion) लॉरेन्स बिश्नोईच्या (Lawrence Bishnoi) टोळीच्या यादीत असल्याचं टोळीचा सदस्य महाकाल याने चौकशीदरम्यान उघड केल्याचं पोलिसांनी सांगितलं. परंतु त्याच्या या दाव्याची अद्याप पडताळणी झाली नसल्याचंही पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. महाकाल हा पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्या प्रकरणातील संशयित शूटर संतोष जाधव याचा जवळचा सहकारी आहे आणि त्याला हत्येच्या कटाची चांगली माहिती होती, असं एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. महाकाल सध्या एका गुन्ह्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असून दिल्ली पोलिसांचं स्पेशल सेल, पंजाब पोलीस आणि मुंबई क्राइम ब्रांचच्या पथकांनी त्याची चौकशी केली. मूसवाला हत्या आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खानला मिळालेल्या धमकीच्या पत्रासंदर्भात त्याची चौकशी केली गेली.

चौकशीदरम्यान महाकालने मूसवाला हत्येच्या कटाबद्दल बरीच माहिती उघड केली आणि हत्येमध्ये संतोष जाधव आणि नागनाथ सूर्यवंशी यांचा सहभाग होता असं त्याने पोलिसांना सांगितलं. त्याने बिश्नोई टोळीच्या भविष्यातील प्लॅनिंगचीही माहिती दिली. या टोळीने करण जोहरला धमकावून त्याच्याकडून 5 कोटी रुपये उकळण्याची योजना आखली होती, असं त्याने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

इन्स्टा पोस्ट-

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

महाकालने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रारचा भाऊ विक्रम ब्रार याने त्याच्याशी इन्स्टाग्राम आणि सिग्नल अॅप्सवर या योजनांबाबत चर्चा केली होती. अमली पदार्थांची तस्करी करणारी एक महिला आणि शीख समुदायाच्या पवित्र ग्रंथाची अपमान केल्याचा आरोप असलेले डॉक्टरदेखील त्यांच्या यादीत होते, असं अधिकाऱ्याने सांगितलं. मात्र त्याच्या या सर्व दाव्यांची पडताळणी तपास यंत्रणा करणार आहे. जाधव आणि त्याचा सहकारी नवनाथ सूर्यवंशी यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी गुजरातमधील भुज इथून अटक केली. मे महिन्यात मूसवालाच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या खळबळीचा फायदा घेण्याचा प्रयत्न बिश्नोई गँगने केला आणि बॉलिवूड सेलिब्रिटींना धमकावण्याचा निर्णय घेतला. सलमान खानला खंडणीसाठी धमकावणं हा विक्रम ब्रारने रचलेल्या या कटाचा एक भाग होता.

प्रसिद्धी मिळवणं आणि त्यासाठी फुशारक्या मारणं हा हेतू अशा दाव्यांमागे असू शकतो, असं पोलिसांचं म्हणणं आहे. पंजाब आणि इतर शेजारील राज्यांमध्ये हे खूपच सामान्य आहे. त्यांना (गुंडांना) त्यांची नावं हाय-प्रोफाइल प्रकरणांशी जोडायची असतात आणि म्हणूनच ते अशी नावं घेतात, असं पोलीस अधिका-याने सांगितलं.

Non Stop LIVE Update
ठाकरे गट 'इतक्या' जागा लढणार? 36 पैकी ‘या’ 25 मतदारसंघासाठी आग्रही
ठाकरे गट 'इतक्या' जागा लढणार? 36 पैकी ‘या’ 25 मतदारसंघासाठी आग्रही.
मुलाला आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल अन्...सी-लिंकवरून त्यानं घेतली उडी
मुलाला आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल अन्...सी-लिंकवरून त्यानं घेतली उडी.
राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर...
राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर....
लोकलमधून उतरताच प्लॅटफॉर्मवरून प्रवाशी धावत सुटले... अंधेरी स्थानकात..
लोकलमधून उतरताच प्लॅटफॉर्मवरून प्रवाशी धावत सुटले... अंधेरी स्थानकात...
राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? बघा IMDचा अंदाज
राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? बघा IMDचा अंदाज.
आंदोलन होतं विशाळगडासाठी, टार्गेट झालं गजापूर, नेमका कोणी घातला धुडगूस
आंदोलन होतं विशाळगडासाठी, टार्गेट झालं गजापूर, नेमका कोणी घातला धुडगूस.
मनोज जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा, आंबेडकरांच्या भूमिकेवरही सवाल
मनोज जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा, आंबेडकरांच्या भूमिकेवरही सवाल.
बहिणीनंतर भाऊही लाडके...शिंदेंकडून नव्या योजना, कोण पात्र अन् अटी काय?
बहिणीनंतर भाऊही लाडके...शिंदेंकडून नव्या योजना, कोण पात्र अन् अटी काय?.
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?.
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?.