उत्तम आरोग्य हवंय तर आजच सोडा ‘या’ 6 रोजच्या सवयी, तज्ञांचा सल्ला

आजकाल प्रत्येकाची जीवनशैली अनहेल्दी झालेली आहे. यामध्ये अनेकांना त्यांच्या रोजच्या सवयी सामान्य वाटतात, पण याच सवयी काळांतराने शरीरावर नकारात्मक परिणाम करतात. चला तर मग अशा 6 सवयी कोणत्या आहेत ज्या तुम्ही आजच बदलल्या पाहिजेत ते जाणून घेऊयात.

उत्तम आरोग्य हवंय तर आजच सोडा या 6 रोजच्या सवयी, तज्ञांचा सल्ला
Bad Habits
Image Credit source: freepik
| Edited By: | Updated on: May 07, 2026 | 10:39 AM

बदलत्या जीवनशैलत आपण आपल्या दैनंदिन जीवनात अशा अनेक सवयी अंगीकारतो ज्या वरवर पाहिल्या तर खूप सामान्य वाटतात, परंतु याच सवयींचा आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात. यामध्ये रात्री उशिरापर्यंत जागे राहणे, अयोग्य आहार घेणे, गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे किंवा तासंतास एकाच जागी बसून राहणे या सवयी उत्तम आरोग्यासाठी धोकादायक ठरतात. कालांतराने या सवयींमुळे गंभीर आजार होऊ शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपले शरीर आपल्याला संकेत देऊ लागते तेव्हाच आपल्याला याची जाणीव होते. आरोग्य तज्ज्ञ आणि संशोधनाने सातत्याने हे दाखवून दिले आहे की आपली जीवनशैली हा आपल्या आरोग्याचा पाया आहे. मात्र काही सामान्य पण अनेकदा दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या सवयी हळूहळू आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करतात आणि हृदयरोग, लठ्ठपणा व मधुमेह यांसारख्या समस्यांचा धोका वाढवतात.

अशा परिस्थितीत आपण समजतो की ज्या सवयी सामान्य आहेत अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केले जातात. तर यावेळी हार्वर्डमध्ये प्रशिक्षित डॉ. सौरभ सेठी यांनी अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात आपण आजपासूनच आपल्या अशा काही रोजच्या सवयी आहेत ज्या आजच बदलल्या पाहिजेत याची माहिती दिली आहे. चला त्या सवयींबद्दल आणि आपल्या आरोग्यावर होणाऱ्या त्यांच्या परिणामाबद्दल जाणून घेऊयात.

बराच वेळ लघवी रोखून ठेवणे

आपल्यापैकी अनेकजण लघवी रोखून धरतात आणि फक्त गरज वाटल्यावरच शौचालयात जातात. मात्र ही सवय आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरते. खरं तर, जेव्हा पित्ताशयात लघवी अडकून राहते, तेव्हा जिवाणूंची झपाट्याने वाढ होऊ शकते, ज्यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका वाढतो.

तोंड उघडे ठेवून झोपणे

ही सवय देखील खूप सामान्य आहे. मात्र तज्ञ सांगतात की तोंड उघडे ठेवून झोपल्याने झोपेची गुणवत्ता बिघडते, तोंड कोरडे पडते आणि घोरण्याची समस्या देखील उद्भवते. सततचे घोरणे ही केवळ एक किरकोळ समस्या नाही तर त्याचा संबंध उच्च रक्तदाबाशी देखील आहे. इतकेच नाही तर स्लीप ॲप्निया ही एक अधिक गंभीर समस्या अंदाजे दर 5 प्रौढांपैकी एकाला होते.

चुकीच्या स्थितीत बराच वेळ बसणे

बराच वेळ चुकीच्या स्थितीत बसल्याने जसे की वाकून बसल्याने किंवा काम केल्याने पाठ आणि मानेवर अतिरिक्त ताण येतो. यामुळे वेदना आणि ताठरपणा येऊ शकतो. शिवाय सतत एका जागी बसून काम केल्यानेसांध्यांच्या समस्या देखील उद्भवू शकतात.

शौचालयात बराच वेळ बसून राहणे

शौचालयात असताना मोबाईल फोन वापरल्यामुळे बहुतेकजण तिथे बराच वेळ बसतात. मात्र शौचालयात जास्त वेळ बसल्यामुळे रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त दाब पडतो, ज्यामुळे मूळव्याधीचा धोका वाढतो.

चेहऱ्याला वारंवार स्पर्श करणे

तुम्हाला जर वारंवार चेहऱ्याला स्पर्श करण्याची सवय असेल, तर आजच ही सवय बदला. दिवसभरात आपले हात अनेक वस्तूंना स्पर्श करतात, ज्यामुळे जीवाणू जमा होतात. अशा हातांनी चेहऱ्याला स्पर्श केल्याने त्वचेचा संसर्ग, पुरळ किंवा जळजळ होऊ शकते.

घाईघाईने जेवणे

आपल्यापैकी असे काहीजण आहेत जे अन्न पटापट खातात, पण अशाप्रकारे खाणे हे देखील आरोग्यासाठी योग्य मानले जात नाही. यामुळे तुम्ही गरजेपेक्षा जास्त खाऊ शकता, ज्यामुळे पोट फुगण्याची समस्या उद्भवू शकते. कारण खूप घाईने अन्नाचे सेवन केल्याने तुमचे पोट भरले आहे हे ओळखायला तुमच्या मेंदूला वेळ मिळत नाही. यामुळे तुम्ही गरजेपेक्षा जास्त खाऊ शकता, ज्यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us