
सोशल मीडियावर लोकांचे हजारो आणि लाखो फॉलोअर्स असले तरी, तुमच्या जीवनातील खऱ्या नात्यांचा अभाव तुम्हाला नेहमीच त्रास देतो. काही लोकं नवीन लोकांशी मैत्री करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतात पण जर ते लोकं चुकीचे निघाले तर तुमच्या आशा भंग होतात. कारण सोशल मीडियाचे जग हे एका दलदलीसारखे आहे. तुम्ही जितके खोलवर जाल तितके त्याच्यातून बाहेर पडताना तुम्हाल खुप मानसिक वेदना तसे त्रास सहना करावा लागतो. त्यात सकारात्मक गोष्टींपेक्षा नकारात्मकता जास्त आहे. जे हळूहळू तुम्हाला त्रास देऊ लागते. तुम्ही तुमच्या फोनमध्ये इतके व्यस्त होता की तुम्ही लवकरच एकाकीपणाचे बळी बनता. तुम्हाला माहितही नाहीये.
तुम्ही जितके जास्त सोशल मीडिया वापरता तितके जास्त तुम्हाला एकटेपणा जाणवतो. इंस्टाग्राम किंवा फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही इतरांच्या आनंदाचे आणि प्रगतीचे फोटो जितके जास्त पाहता तितके तुमच्या आत मत्सर, तुलना आणि एकाकीपणाच्या भावना निर्माण होतात. चला तर मग आजच्या या लेखात आपण जाणून घेऊयात की, सोशल मीडियाचा वाढता वापर लोकांमध्ये एकटेपणा कसा निर्माण करू शकतो?
सोशल आइसोलेशन म्हणजे काय?
सोशल आइसोलेशन (सामाजिक अलगाव आणि एकाकीपणा) म्हणजे तुम्ही कोणाशीही बोलत नाही आणि लोकांमध्ये जास्त मिक्स होत नाही. सामाजिक मेळावे कमी आवडतात आणि हळूहळू तुम्ही सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घेणे थांबवता, परिणामी तुम्ही एकाकीपणाचे बळी बनता.
सोशल मीडिया तुम्हाला एकाकी का बनवतो?
सोशल मीडियाचा सर्वात मोठा नुकसान म्हणजे सोशल मीडियाद्वारे लोकं नवीन लोकांशी जे काही संबंध जोडतात ते खरे संबंध नसतात. म्हणूनच जेव्हा आपण त्यांच्याकडून जास्त अपेक्षा करतो तेव्हा आपल्याला वाईट वाटते. कारण समोरासमोर बोलणे आणि कॉल किंवा मेसेजवरून बोलणे यात फरक आहे. तुम्ही एकमेकांच्या भावना आणि इमोशन समजू शकत नाही, ज्यामुळे तुम्हाला असे वाटते की समोरची व्यक्ती तुम्हाला काय म्हणत आहात ते समजत नाही.
काही क्षणाचा आनंद मिळतो
सोशल मीडियावर नवीन लोकांशी मैत्री केल्याने तुम्हाला काही क्षणांचा आनंद मिळतो. पण सत्य हे आहे की इथे तुमचे 500 मित्र असले तरी त्यापैकी कोणीही तुमचा खरा मित्र नाही. सोशल मीडिया हळूहळू तुम्हाला वास्तविक जगापासून आणि लोकांपासून दूर करत आहे, परिणामी तुम्हाला एकटेपणा जाणवतो.
स्वतःला इतरांपेक्षा कमी दर्जाचे समजणे
सोशल मीडियावर इतरांना त्यांच्या करिअरमध्ये, प्रेमात किंवा जीवनाच्या कोणत्याही पैलूमध्ये चांगले काम करताना पाहून, कधीकधी लोकं त्यांच्या आयुष्याची तुलना त्या लोकांशी करू लागतात आणि यामुळेच त्यांना एकटेपणा जाणवतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)