डाळ शिजवताना त्यावर येणारा पांढरा फेस आरोग्यासाठी धोकादायक असतो? तो काढावा की नाही?

डाळ शिजवताना अनेकदा त्या डाळीवर फेस येतो. बऱ्याचजणांना तो फेस विषारी वाटतो त्यामुळे ते काढून टाकतात तर काहींना तो तसाच ठेवतात. त्यामुळे अनेकांना याबद्दल गोंधळ असतो. तर जाणून घेऊयात डाळीवर येणारा हा फोम आरोग्यासाठी हानिकारक असतो की नाही? 

डाळ शिजवताना त्यावर येणारा पांढरा फेस आरोग्यासाठी धोकादायक असतो? तो काढावा की नाही?
Is the foam formed on lentils while cooking harmful to health
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Oct 01, 2025 | 6:25 PM

आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात सर्वप्रकारच्या डाळी असतात. या डाळी आपल्या शरीरासाठी फारच पौष्टिक मानल्या जातात. मग त्या सुक्या भाजीच्या स्वरुपात खा, किंवा मग भाजावर पातळ डाळ म्हणून खा, फक्त कोणत्याही स्वरुपात या डाळी आपल्या पोटात जाणे फार गरजेचे असते. कारण त्यामुळे अनेक व्हिटॅमिन आणि पोषक घटक आपल्या शरीराला मिळत असतात.

त्यामुळे अनेकदा रात्रीच्या जेवणात अनेकांकडे डाळ भात किंवा कोणत्याही डाळीची डाळीची भाजी असते. पण अनेकदा डाळ शिजवताना त्यावर हलकासा पांढरा किंवा पिवळसर असा फेस येतो. अशावेळी ते फेसाचे पाणी काढून फेकून द्यावे की नाही असा प्रश्न पडतो. कारण हा फेस आरोग्यासाठी हानिकारक असतो कि नाही असा प्रश्न अनेकदा पडतो. त्यामुळे बरेच लोक गोंधळात असतात.

त्यामुळे काही लोक फेस काढून टाकतात, तर काही जण तो तसाच राहू देतात. मग यामागील नक्की सत्य काय आहे? पोषणतज्ज्ञ यांनी याबाबत सांगितलं आहे. तसेच याबद्दलचा गोंधळही दूर केला आहे.

डाळींमध्ये फेस का तयार होतो?

जेव्हा आपण कोणतीही डाळ शिजवतो तेव्हा त्यातील स्टार्च, प्रथिने आणि सॅपोनिन्स पाण्यात विरघळतात आणि त्यामुळे डाळ शिजताना. हा फेस कोणत्याही प्रकारे हानिकारक नाही.

सॅपोनिन्स म्हणजे काय?

सॅपोनिन्स हे वनस्पतींमध्ये आढळणारे नैसर्गिक एंजाइम आहेत. वनस्पती कीटक आणि जंतूंपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ते तयार करतात. कडधान्ये देखील वनस्पतींपासून मिळत असल्याने, त्यात सॅपोनिन्स असणे सामान्य आहे. हो, हे घटक आपल्या शरीरासाठी हानिकारक नाहीत परंतु अनेक प्रकरणांमध्ये फायदेशीर ठरू शकतात.


हे फोम आरोग्यासाठी हानिकारक आहे का?

लोक अनेकदा या फेसाला युरिक अॅसिड किंवा इतर विषारी पदार्थ समजतात, परंतु हा पूर्णपणे गैरसमज आहे. हा फोम विषारी नाही आणि त्यामुळे कोणताही आजार होत नाही. वैज्ञानिक संशोधनातून असे दिसून आले आहे की त्यात असलेले सॅपोनिन्स, स्टार्च आणि प्रथिने शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात.

या डाळीवरील फेसामुळे होणारे फायदे

पचनसंस्था मजबूत करण्यास मदत होते

शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकते .

रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते.

याचा आतड्याच्या आरोग्यावर आणि रोगप्रतिकारक शक्तीवरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

म्हणून पुढच्या वेळी डाळ शिजवताना फेस दिसला तर तो विषारी म्हणून फेकून देण्याची गरज नाही. पण जर तुम्हाला डाळीचा फेस नकोच असेल तर काय करावं तोही उपाय जाणून घेऊयात.

डाळीचा फेस कमी करण्यासाठी घरगुती उपाय

जरी फोम हानिकारक नसला तरी, जर तुम्हाला ते आवडत नसेल, तर तुम्ही या सोपी ट्रिक वापरून ते कमी करू शकता. डाळ शिजवण्यापूर्वी काही तास धुवून भिजवा. त्यामुळे फेस तयार होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होते.

डाळीतील फेस ही एक नैसर्गिक प्रक्रिया

डाळीतील फेस ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्याबद्दल घाबरण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही. ती शरीरासाठी हानिकारक नाही आणि त्यामुळे कोणताही आजार होऊ शकत नाही. खरं तर, डाळीचे नियमित सेवन आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. जर तुम्हाला फेस पूर्णपणे काढून टाकायचा असेल तर धुवून, भिजवून आणि शिजवताना थोडे तूप घालून ते सहजपणे कमी करता येते.