AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिमगोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांसाठी गुडन्यूज, होळीसाठी मध्य रेल्वे सोडणार विशेष गाड्या, बुकींग कधीपासून

होळी आणि शिमग्यासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने १८६ विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. मुंबई-सावंतवाडी आणि नागपूर मार्गावरील या गाड्यांचे बुकिंग १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, प्रवाशांनी वेळापत्रक पाहून आपले तिकीट आरक्षित करावे.

शिमगोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांसाठी गुडन्यूज, होळीसाठी मध्य रेल्वे सोडणार विशेष गाड्या, बुकींग कधीपासून
| Updated on: Feb 18, 2026 | 2:45 PM
Share

कोकणचा सर्वात मोठा आणि उत्साहाचा सण म्हणजे होळी आणि शिमगा. या शिमगोत्सवासाठी मुंबईतून गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची दरवर्षी रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळते. दरवर्षीप्रमाणे यंदाही नियमित गाड्यांची तिकिटे फुल्ल झाल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने कंबर कसली आहे. यंदाच्या उत्सवासाठी कोकणासह महाराष्ट्रातील इतर भाग आणि देशभरातील विविध राज्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने तब्बल १८६ विशेष गाड्या चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई-सावंतवाडी, मुंबई-नागपूर आणि पुणे-नागपूर अशा महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे. तसेच उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठीही विशेष सोय करण्यात आली आहे. या विशेष गाड्यांमुळे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत जाणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन या फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः मुंबई-सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या गाड्यांमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या १८६ गाड्यांचे दोन मुख्य गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. यात होळी विशेष गाड्यांच्या ९४ फेऱ्या असतील. या गाड्या केवळ होळीच्या सणांपुरत्या मर्यादित असतील. तर नियमित विशेष गाड्यांच्या ९४ फेऱ्या असतील. या गाड्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील गर्दी कमी करण्यासाठी नियोजित वेळापत्रकानुसार धावतील.

प्रमुख मार्ग कोणते?

कोकण मार्ग: मुंबई ते सावंतवाडी रोड (थेट सेवा).

विदर्भ मार्ग: मुंबई ते नागपूर आणि पुणे ते नागपूर.

उत्तर भारत: मुंबई/पुणे येथून बनारस, गोरखपूर, समस्तीपूर आणि दानापूर या शहरांसाठी विशेष लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जातील.

सावंतवाडी रोड विशेष गाड्यांचे वेळापत्रक

मुंबई-सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या गाड्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आठवड्यातून दोनदा धावतील. या गाड्यांच्या निश्चित तारखा आणि वेळ रेल्वेच्या अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी आणि कणकवली अशा प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण १८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यावेळी प्रवाशांना आयआरसीटीसी (IRCTC) च्या अधिकृत वेबसाइटवर किंवा रेल्वे स्थानकांवरील पीआरएस (PRS) केंद्रांवरून बुकिंग करता येईल. होळीच्या काळात होणारी प्रचंड गर्दी पाहता, प्रवाशांनी १८ तारखेलाच आपले आरक्षण निश्चित करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...