AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत पावसाचा कहर! विद्यापीठाच्या परीक्षा रद्द; मोठा निर्णय

Mumbai rain update : मुंबईत पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. मुंबईत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबईत पावसाचा कहर! विद्यापीठाच्या परीक्षा रद्द; मोठा निर्णय
| Updated on: Jul 06, 2026 | 9:01 AM
Share

राज्याच्या मुंबई, पुणे, आजूबाजूच्या महानगर क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे जीनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईतील विविध भागात भीषण दुर्घटना घडल्या आहेत. तर आज सोमवारी मुंबई, ठाणे आणि इतर काही जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आल आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाकडून 6 जुलै रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या नवीन तारखेची लवकरच घोषणा केली जाईल.

मुंबई शाळा, कॉलेज बंद 

मुंबई विद्यापीठात आज सोमवारी एलएलएम, एमएससी, एम. कॉमच्या परीक्षा होणार होत्या. परंतु मुंबईतील मुसळधार पावसामुळे विद्यापीठ प्रशासनाने आज होणाऱ्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मागील 6 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसामुळे प्रशासनाने शाळांना सुट्टी दिली आहे.

परीक्षा पुढे ढकलल्या 

मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं की, भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून मुंबई विद्यापीठाच्या 6 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत. मुंबई विद्यापीठांच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी वेळोवेळी संकेतस्थळावरील सूचना पाहाव्यात. विद्यार्थी, महाविद्यालये आणि संबंधित सर्वांनी याची नोंद घ्यावी.

मुंबईत डबेवाल्यांची सेवा आज बंद

मुसळधार पावसाच्या (Mumbai Rain) पार्श्वभूमीवर 6 जुलै रोजी मुंबईत डबेवाल्यांची सेवा बंद राहील. डबेवाले संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी सांगितलं की, विरार-वसई क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. या व्यतिरिक्त अनेक रेल्वे स्टेशनजवळ ट्रॅकवर पाणी साचलं आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या कारणात्सव आज सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 125 वर्षांच्या सेवेत पहिल्यांदा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आलं आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आज ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीविषयी दिलगिरी व्यक्त करतो’.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे