AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्राझीलचे वर्ल्ड कपमधून पॅकअप, स्पर्धेतून बाहेर होताच ज्युनिअर नेमार ढसाढसा रडला, अन् पुढे जे म्हणाला त्याने लाखो चाहत्यांच्या काळजात धस्स झालं

फिफा विश्वचषकाचा सामना ब्राझील आणि नॉर्वेमध्ये रंगला. या सामन्यात ब्राझील नॉर्वेविरुद्ध 1-2 ने हरले. यामुळे चाहत्यांनामध्ये निराशा पसरलेली होती पण यानंतरही चाहत्यांना एक मोठा धक्का मिळाला आणि तो म्हणजे दिग्गज फुटबॉलपटू नेमारची निवृत्ती.

ब्राझीलचे वर्ल्ड कपमधून पॅकअप, स्पर्धेतून बाहेर होताच ज्युनिअर नेमार ढसाढसा रडला, अन् पुढे जे म्हणाला त्याने लाखो चाहत्यांच्या काळजात धस्स झालं
neymar retirement
| Updated on: Jul 06, 2026 | 8:47 AM
Share

ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू नेमारने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. फिफा विश्वचषक 2026 मधून त्याच्या संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला. सोमवारी झालेल्या 16 संघांच्या फेरीतील सामन्यात नॉर्वेने ब्राझीलला 2-1 ने हरवून मोठा धक्का दिला. यानंतर, नेमारने आपल्या राष्ट्रीय संघाकडून न खेळण्याचा निर्णय घेतला. सामन्यादरम्यान नेमार खूप भावूक झालेला दिसला. नॉर्वे ब्राझीलला हरवून त्यांना विश्वचषकातून बाहेर काढेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. आपल्या संघाच्या पराभवाने नेमार पूर्णपणे खचून गेला, तो खाली बसून रडतानाही दिसला आणि त्याने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात ब्राझीलसाठी गोल करणारा नेमार हा एकमेव खेळाडू होता. त्याने पेनल्टीवर गोल करून खाते उघडले, पण तरीही त्याचा संघ एका गोलने मागे राहिला.

सामन्यानंतर नेमार म्हणाला की, मी आपल्या संघाला जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण तो अयशस्वी ठरला. मी प्रयत्न केला. याची सुरुवात इथेच मेटलाइफ स्टेडियममध्ये झाली आणि इथेच शेवट होत आहे. आता सर्व काही संपले आहे.” नेमारने ब्राझीलसाठी आपला पहिला सामना याच स्टेडियममध्ये 9 ऑगस्ट 2010 रोजी अमेरिकेविरुद्ध खेळला होता. पोटरीच्या दुखापतीमुळे, तो या विश्वचषकादरम्यान ब्राझीलच्या पाचपैकी केवळ दोनच सामन्यांमध्ये खेळू शकला. नॉर्वेविरुद्धच्या सामन्यात तो बराच वेळ बेंचवर होता, त्यानंतर संधी मिळताच त्याने पेनल्टीवर गोल केला

नेमार आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये ब्राझीलचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून निवृत्त होत आहे. त्याने आपल्या देशासाठी एकूण 130  आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यात त्याने 80 गोल केले आणि 59 असिस्ट्स दिले. आपल्या 16 वर्षांच्या कारकिर्दित, त्याने कठीण काळात अनेकदा संघाला विजय मिळवून दिला. तो ब्राझीलसाठी चार विश्वचषक आणि दोन ऑल्मिपिक स्पर्धांमध्ये खेळला. 2012 मध्ये त्याने ब्राझीलसोबत ऑलिम्पिक रौप्य पदक जिंकले आणि 2016 मध्ये सुवर्ण पदक जिंकले.

नेमारने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे, परंतु तो क्लब फुटबॉल खेळणे सुरू ठेवणार आहे. तो सँटोस एफसीसोबत आपली क्लब कारकीर्द पुढे चालू ठेवणार असून, प्रत्येक हंगामात आपल्या भविष्याचा आढावा घेत आहे. उजव्या पायाच्या पोटरीच्या सततच्या दुखापतीमुळे, नेमार स्पर्धेतील ब्राझीलच्या पाचपैकी केवळ दोनच सामन्यांमध्ये खेळला. गट फेरीतील स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात तो 15 मिनिटे मैदानात होता आणि नॉर्वेविरुद्धच्या सामन्यात 67 व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला. एक दशकाहून अधिक काळ ब्राझीलचा सर्वोत्तम खेळाडू असलेल्या नेमारचा खेळ गेल्या काही वर्षांपासून दुखापतींमुळे मंदावला आहे, ज्यामुळे त्याची परिणामकारकता कमी झाली आहे. देश आता स्थित्यंतराच्या काळात आहे, जिथे पुढची पिढी नेतृत्व करत आहे.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...