Gold, silver prices : सोन्या, चांदीच्या दरात सर्वात मोठी घसरण, सराफा व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले, थेट..
सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण सुरूच आहे. त्यामुळे व्यापार्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. चांदीचे दर देखील मोठ्या प्रमाणात घसरले आहेत.

सोन्याच्या दरात मोठी घसरण Image Credit source: टीव्ही 9 मराठी
- सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण सुरूच आहे. त्यामुळे व्यापार्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. चांदीचे दर देखील मोठ्या प्रमाणात घसरले आहेत.
- दरम्यान सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने, स्वर्णनगरी जळगावमध्ये ग्राहकांनी सोनं खरेदी करण्यासाठी सराफ बाजारात गर्दी केली आहे.
- गेल्या 48 तासांमध्ये सोन्याच्या दरात प्रति तोळा तब्बल सात हजार रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदीच्या किंमत प्रति किलो दहा हजार रुपयांनी कमी झाली आहे.
- डॉलर वाढल्यामुळे आणि डिसेंबर महिन्यात होणाऱ्या यूएस गव्हर्नमेंटच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागल्यामुळे दर घसरले आहेत. सध्या सोने आणि चांदी दोन्ही वर्षभरातील ऑल टाइम लो वर आहेत, अशी माहिती यावेळी व्यापार्यांकडून देण्यात आली आहे.
- एकीकडे सोन्याचे दर कमी झाले आहेत, मात्र दुसरीकडे दुकानांमध्ये सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केल्यामुळे दिलासा मिळाल्याचंही यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.
Follow Us





