AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gondia Ration Scam: मोफत रेशनिंगचा सर्वात मोठा स्कॅम! 200 मृतांच्या नावावर लाटले रेशन; मिशन सुधारच्या रिपोर्टने खळबळ

एकीकडे राज्यातील जनता दुष्काळाने होरपळत आहे. गरिबांच्या पोटापाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे. अशातच गरिबांच्या हक्काच्या रेशनिंगवर डल्ला मारला जात असल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. आता प्रशासन यावर काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Gondia Ration Scam: मोफत रेशनिंगचा सर्वात मोठा स्कॅम! 200 मृतांच्या नावावर लाटले रेशन; मिशन सुधारच्या रिपोर्टने खळबळ
| Updated on: Nov 21, 2026 | 2:48 PM
Share

Gondia Ration Scam: राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या झळांनी होरपळत आहे. दुष्काळाच्या झळा बसत असताना सरकारकडून मिळणाऱ्या स्वस्त रेशनिंगने गोरगरीब जनतेला मदत होते, पोटापाण्याच्या सोईसाठी हातभार लागतो. मात्र या रेशनिंग पुरवठ्यामध्येही अनेक गैरप्रकार होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. असाच धक्कादायक प्रकार गोंदिया जिल्ह्यामधून समोर आला आहे. गोंदियामध्ये 200 मृतांच्या नावावर रेशन उचलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? वाचा..

काय आहे नेमकं प्रकरण?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिवंत व्यक्तींच्या हक्काचे रेशन मिळविण्यासाठी अनेकांना प्रतीक्षा करावी लागत असताना जिल्ह्यात मात्र तब्बल सात हजार 200 मृत व्यक्तींच्या नावावर रेशनची उचल होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील शिधापत्रिकांच्या पडताळणीसाठी राबविण्यात आलेल्या ‘मिशन सुधार’ मध्ये ही बाब उघड झाली.

मृत व्यक्तींची नावे, दुबार नोंदी आणि चुकीचे आधार क्रमांक अशा विविध त्रुटी आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण 10 हजार 894 नावे शिधापत्रिकांमधून कमी करण्यात आली आहेत. ‘मिशन सुधार’मुळे अशा अनियमित नोंदी हटविण्यास मदत झाली असून, पात्र लाभार्थ्यांनाच शासकीय धान्याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, मृतांच्या नावावर किती काळ आणि किती प्रमाणात धान्याची उचल झाली? हे मात्र कोडेच आहे.

एकीकडे राज्यातील जनता दुष्काळाने होरपळत आहे. गरिबांच्या पोटापाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे. अशातच गरिबांच्या हक्काच्या रेशनिंगवर डल्ला मारला जात असल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. आता प्रशासन यावर काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काय आहे मिशन सुधार योजना?

मिशन सुधार (किंवा मिशन सुधार अभियान) ही महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (PDS) पारदर्शकता आणण्यासाठी राबविण्यात येणारी शिधापत्रिका (रेशन कार्ड) पडताळणी व सुधारणा मोहीम आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश अपात्र, दुबार किंवा मृत लाभार्थ्यांची नावे वगळून खऱ्या व पात्र लाभार्थ्यांपर्यंत रेशनचे धान्य पोहोचवणे हा आहे.

Follow Us
देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोल....
Delhi Toll : देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोलनाक्यांवर नवी MLFF प्रणाली सुरू
चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त....
Kartiki Ekadashi : चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी वारकऱ्यांची प्रार्थना
कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील..
Beed Farmer Issue : कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील शेतकरी संकटात
लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी
Latur Water Issue : लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी आणण्याच्या मुद्द्यावरून जुंपली
छगन भुजबळ आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर; ओतूरच्या अधिवेशनात राजकीय चर्चा
Chhagan Bhujbal-Amol Kolhe : छगन भुजबळ आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर; ओतूरच्या अधिवेशनात राजकीय चर्चांना उधाण
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, भाजपचा...
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, पत्रकार परिषद घेऊन भाजपचा मोठा दावा
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला...
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला; PM मोदींबाबतही मोठा दावा!
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती...
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती, दिल्ली कोर्टात महत्त्वाची सुनावणी
रायगडच्या राजकारणात ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा...
रायगडच्या राजकारणात वादा ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा, म्हणाले 'उलटी गिनती सुरू'
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा...
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय