Video : परिस्थितीपुढे न झुकणार नाही ! व्हिलचेअरवरून फूड डिलिव्हरी करणाऱ्या आशिषची सोशल मीडियावर चर्चा
आपल्यालाच काम मिळत नाही. आपल्या आयुष्यात काही चांगलं घडतचं नाही. अशा तक्रारी आपण करत असतो. पण हा व्हिडिओ पाहून जिद्द काय असते. याचा प्रत्यय तुम्हाला आल्यावाचून राहणार नाही.

या मुंबईत प्रत्येक जण स्वत:ची स्वप्न पूर्ण करायला येतो. असं म्हणतात की ही मुंबई कोणालाही उपाशी झोपू देत नाही. प्रत्येकाच्या हाताला इथे काही ना काही काम असतंच, शिवाय स्वप्न पूर्ण करायला आलेला प्रत्येक जण इथे मेहनत करताना दिसतो. आपल्या पोटाची खळगी भरताना दिसतो. त्याच गर्दीत स्वीगी, झोमॅटो यांसारख्या फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांनी तरूणांच्या हाताला काम दिले आहे. अशाच एका व्हिलचेअर बसून फूड डिलिव्हरी करणाऱ्या तरूणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सेन्सेंशन ठरत आहे. व्हिलचेअर त्यावर फूड डिलिव्हरी आणि चेहऱ्यावर मोठं हसू असणारा असा हा तरूण
व्हिलचेअरवर डिलिव्हरी, चेहऱ्यावर मोठं हसू
मुंबईतील साक्षी नावाच्या महिलेने हा व्हिडिओ शेअर केला आहे.ती प्रवास करत असाताना तिची नजर रस्त्यावरून व्हिलचेअर फूड डिलिव्हरी करणाऱ्या एका डिलिव्हरी बॉयकडे जाते. विशेष म्हणजे व्हिलचेअरवर बसून फूड डिलिव्हरी करण्याचे काम करतो. अपंगत्व आल्यावर एखादा तरूण पार खचून जातो. पण सगळेच तसे नसतात. काही जण वेगळ्याच मातीत तयार झालेले असतात. जे त्यांच्या कमरतेलाच जगण्याचं बळ बनवतात. असा हा अवलिया म्हणजेच आशिष ताबे. कानात हेडफोन,चेहऱ्यावर छान हसू आणि अगदी आनंदात पुढे जात होता.
View this post on Instagram
व्हिडिओ शूट करणाऱ्या महिलेने गाडीतूनच त्याला हात दाखवला. त्याने हसून प्रतिसादही दिला. हाच क्षण साक्षी यांनी कॅमेऱ्यात टिपला. या व्हिडिओला त्या महिलेने एक मनाला स्पर्श करणारं कॅप्शन लिहिलं आहे. तिने लिहिलंय की ‘कधी कधी अनोळकी व्यक्ती सुद्धा आपल्याला आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देऊन जाते. कितीही अडथळे आले तरी पुढे जात राहणं, हसत राहणं आणि आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टिंचा मनमुराद आनंद घेणं,कसं असतं हे त्या माणसाकडे पाहून कळतय. तसंच वेगवेगळ्या क्षमता असलेल्या व्यक्तींनाही कामाचा संधी मिळणं कठीण असतं. पण झोमॅटोने ते वातावरण अशा तरूणांसाठी तयार केलंय. असं म्हणत त्यांनी झोमॅटोचे आभारही मानले.
नेटकऱ्यांकडून आशिषवर कौतुकांचा वर्षाव
हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर काही वेळातच व्हायरल झाला. त्याला 40 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. अनेकानी आशिष याच्या मेहनतीचं भरभरून कौतुक केलं आहे. त्याला अनेक आशीर्वादही दिले आहेत. कित्येकांनी त्याच्या हिंमतीच कौतुक केलं आहे. तर अनेकांनी त्याच्या स्वाभिमानाला आणि जिद्दीला सलाम केला आहे.
काहींनी त्याच्या चेहऱ्यावरील हसू आणि व्हिलचेअरवरून काम करतानाचा तो आनंद मनाला स्पर्श करून गेल्याचं म्हटलं आहे. रोज आपल्या कामाची तक्रार करणाऱ्या, सोईं सुविधांची तक्रार करणाऱ्या लोकांसाठी हा व्हिडिओ डोळे उघडायला लावणारा आहे.
