AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Politics: रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार? शरद पवारांच्या खास शिलेदाराने स्पष्ट सांगितलं

अमोल कोल्हे यांच्या मालिकांबाबत चर्चा झाली. राष्ट्रवादी विलिनिकरणावर कोणतीही चर्चा झाली नाही, त्याबाबत तिथे काय चर्चा करणार  असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.  तसेच सध्यातरी विलिनीकरण होईल असं वाटत नाही," असे महत्त्वाचे विधानही छगन भुजबळ यांनी यावेळी केले.

Maharashtra Politics: रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार? शरद पवारांच्या खास शिलेदाराने स्पष्ट सांगितलं
| Updated on: Nov 21, 2026 | 3:11 PM
Share

Maharashtra Poltitics News:  जुन्नर तालुक्यातील ओतुर येथे आज राज्यव्यापी सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अधिवेशनाआधी मंत्री छगन भुजबळ आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यामध्ये खलबंत झाल्याची माहिती सुत्रांनी दिली होती. याबाबत आता दोन्ही नेत्यांनीच महत्त्वाचा खुलासा केला आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ? 

“अमोल कोल्हेही या कार्यक्रमासाठी आले होते, त्यांच्याशी माझे बोलणे झाले. मात्र आजच्या कार्यक्रमाबाबतच चर्चा झाली. तसेच अमोल कोल्हे यांच्या मालिकांबाबत चर्चा झाली. राष्ट्रवादी विलिनिकरणावर कोणतीही चर्चा झाली नाही, त्याबाबत तिथे काय चर्चा करणार  असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.  तसेच सध्यातरी विलिनीकरण होईल असं वाटत नाही,” असे महत्त्वाचे विधानही छगन भुजबळ यांनी यावेळी केले.

खासदार अमोल कोल्हेंनीही केला खुलासा! 

दुसरीकडे अमोल कोल्हे यांनीही या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनीही विलिनीकरणावर महत्त्वाचे विधान केले. अजित पवार होते तेव्हा चर्चाच झाली नाही असं काही लोक म्हणत होते, मात्र आता ते अचानक चर्चा झाल्याचं सांगत आहेत. आता त्या लोकांना अचानक हे का बोलायला लागलं? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे,  असे म्हणत आमच्याकडे तशा कोणत्याही चर्चा सुरु नाहीत, असं खासदार कोल्हे यांनी स्पष्ट केले.

रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार? अमोल कोल्हेंनी थेट सांगितलं! 

दरम्यान,  गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चा माध्यमांमध्ये आहेत. याबाबतही खासदार अमोल कोल्हेंनी खुलासा केला. काँग्रेसमध्ये जाणार असं रोहित पवारांनी माध्यमांना सांगितलं आहे का? चर्चा काहीही घडवता येतात. स्वतः रोहित पवार हे महाराष्ट्रामध्ये अत्यंत धडाडीने विरोधकांची भूमिका मांडत आहेत. लगेच त्यावरुन काही अर्थ काढणे चुकीचे आहे. रोहित पवारांकडून महाराष्ट्राला आशा आहेत. ते युवा नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. त्यामुळे अशी चर्चा आहे म्हणत त्यांच्यावर टॅग लावू नये, अशी विनंतीही खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे.

Follow Us
रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय..
Navnath Ban Vs Rohit Pawar : रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय म्हणाले?
दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर
Nanded Drought : दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी
देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोल....
Delhi Toll : देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोलनाक्यांवर नवी MLFF प्रणाली सुरू
चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त....
Kartiki Ekadashi : चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी वारकऱ्यांची प्रार्थना
कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील..
Beed Farmer Issue : कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील शेतकरी संकटात
लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी
Latur Water Issue : लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी आणण्याच्या मुद्द्यावरून जुंपली
छगन भुजबळ आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर; ओतूरच्या अधिवेशनात राजकीय चर्चा
Chhagan Bhujbal-Amol Kolhe : छगन भुजबळ आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर; ओतूरच्या अधिवेशनात राजकीय चर्चांना उधाण
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, भाजपचा...
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, पत्रकार परिषद घेऊन भाजपचा मोठा दावा
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला...
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला; PM मोदींबाबतही मोठा दावा!
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती...
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती, दिल्ली कोर्टात महत्त्वाची सुनावणी