Video : डोक्यावर गवताचा भारा अन् त्यावर मोराचा राजेशाही थाट; अनोखा व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क
गावाकडेची दृश्य मनमोहून घेणारीच असतातं. पण कधी अशा काही गोष्टी घडतात की त्या काही क्षण थांबून बघतच बसावं असं वाटतं. सध्या सोशल मीडियावर असा काही व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे नेटकरी थक्क झाले आहेत.

गावाकडेची दृश्य मनमोहून घेणारीच असतातं. पण कधी अशा काही गोष्टी घडतात की त्या काही क्षण थांबून बघतच बसावं असं वाटतं.डोक्यावर गवताचा मोठा भारा घेऊन जाणारी महिला आणि त्याच गवताच्या भाऱ्यावर आरामात राजसी थाटात डौलदारपणे बसलेला मोठा मोर. असं काहीसं डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. निर्सगाचा हा सुंदर नजारा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
महिलेच्या डोक्यावरील गवताच्या भाऱ्यावर मोराची सवारी
व्हायरल व्हिडिओमध्ये एक ग्रामीण महिला डोक्यावर गवताचा भारा घेऊन जाताना दिसत आहे. डोक्यावरील गवताचा भारा सांभाळत तिचे दोन्ही हात वर आहेत. भारा सांभाळत ती महिला चालत देखील आहे आणि तिच्या त्या डोक्यावरच्या भाऱ्यावर विराजमान आहे तो आपला राष्ट्रीय पक्षी मोर.
ग्रामीण भारत के सुन्दरतम नज़ारे…❤️ https://t.co/xVGcB4abNd
— 🇮🇳 Ram Singh Naglot🐬 (@NaglotR) November 19, 2026
हा तुरेवाला मोर गवताच्या भाऱ्यावर अगदी निवांत बसलेला दिसतो आहे. विशेष म्हणजे महिला चालत असताना तो तिथेच बसून राहतो. व्हिडिओमध्ये मोर गवतावर आपली जागा बदलताना दिसतो आणि पुढे झुकतानाही दिसतो. त्यामुळे हे दृश्य लक्ष वेधून घेणारं आहे. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तो मोर पाळलेला आहे की जंगली आहे हे देखील स्पष्ट झालेले नाही.
सोशल मीडियावर व्हिडिओची चर्चा
हा व्हिडिओ एक्सवर शेअर करण्यात आला. त्याला एका वापरकर्त्याने सुंदर दृश्य यापूर्वी कधीच पाहिलं नाही असं म्हटलंय तर दुसऱ्याने गावाकडच्या सौंदर्यचे कौतुक केलं आहे. सहसा मोर शेतात, मोकळ्या मैदानात किंवा झाडांजवळ फिरताना दिसतो. पावसाळ्यात पिसारा फुलवून नाचणारा मोर तर अनेकांना आकर्षित करतो. पण इथे मात्र मोराने थेट महिलेच्या डोक्यावरील गवताच्या भाऱ्यावर मुक्काम ठोकल्याने हा व्हिडिओ नेटकऱ्यांसाठी कुतुहलाचा विषय ठरला.
