Alka Kubal Elder Daughter: अल्का कुबल यांची मोठी मुलगी कॅप्टन, धाकटी काय करते? नुकताच झाला साखरपुडा
Alka Kubal Elder Daughter: मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री अल्का कुबल या कामयच चर्चेत असतात. सध्या त्यांच्या दोन्ही मुली चर्चेत आहेत. त्यांची मोठी मुलगी कॅप्टन आहे हे सर्वांनाच माहिती आहे. पण धाकटी मुलगी काय करते? कोणाला माहिती आहे का?

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री अलका कुबल यांनी बालकलाकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात करत आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधून विविध भूमिका साकारत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यातही कुटुंबाची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळणाऱ्या अलका कुबल यांच्या दोन्ही मुलीही कायम चर्चेत असतात. त्यांची मोठी मुलगी वैमानिक आहे पण धाकटी काय करते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया…
मोठी मुलगी वैमानिक
अलका कुबल यांचे पती समीर आठल्ये हे नामवंत सिनेमॅटोग्राफर आहेत. या दांपत्याला दोन मुली आहेत आणि दोघींनीही अभिनयाऐवजी पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात कारकिर्द घडवली आहे. मोठी मुलगी इशानी आठल्ये ही वैमानिक आहे. तिने २०१५ मध्ये पायलटचा परवाना मिळवला आणि वैमानिक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. २०२२ मध्ये तिने दिल्लीतील निशांत वालिया यांच्याशी विवाह केला.
काय करते कस्तुरी आठल्ये
धाकटी मुलगी कस्तुरी आठल्ये हिने वैद्यकीय क्षेत्र निवडले. तिने फिलिपिन्समध्ये एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आणि भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली एफएमजीई परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली.
काही दिवसांपूर्वीच झाला होता साखरपुडा
आता कस्तुरीच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. १५ नोव्हेंबर रोजी तिचा संकेत यांच्याशी साखरपुडा पार पडला. रुखवत व शोभेच्या वस्तू तयार करणाऱ्या एका कलाकाराने शेअर केलेल्या व्हिडिओमधून ही माहिती समोर आली आहे.
