AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana : दिशाभूल करण्याचा हेतू…आदिनाथ कोठारेचा ‘रामायण’ वादाच्या विळख्यात, विश्व हिंदू परिषदेची मोठी मागणी

Ramayana Movie : विश्व हिंदू परिषदेनं 'रामायण' सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्याची मागणी केली आहे. हा सिनेमा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय, असं संस्थेचं म्हणणं आहे.

Ramayana : दिशाभूल करण्याचा हेतू...आदिनाथ कोठारेचा 'रामायण' वादाच्या विळख्यात, विश्व हिंदू परिषदेची मोठी मागणी
| Updated on: Nov 21, 2026 | 2:49 PM
Share

रणबीर कपूर आणि यश यांच्या ‘रामायण’ चित्रपटावरून सुरू असलेला वाद वाढत चालला आहे. अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत. विश्व हिंदू परिषदेनं (VHP) चित्रपटाचं प्रदर्शन तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. महर्षी वाल्मीकींनी लिहिलेल्या रामायणातील अनेक घटना चित्रपटात चुकीच्या पद्धतीने मांडल्या असून, त्यामुळे हिंदू भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असा आरोप संघटनेनं केला आहे.

सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्याची मागणी

विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सरचिटणीस बजरंग बागडा यांनी चित्रपट निर्मात्यांवर प्रभू राम आणि त्यांच्या कुटुंबाचं चुकीचं चित्रण करून रावणाचं उदात्तीकरण केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, रामायणातील अनेक महत्त्वाचे प्रसंग चित्रपटातून वगळण्यात आले आहेत किंवा त्यात फेरफार करण्यात आला आहे. हा चित्रपट भगवान रामाचा राक्षसांविरुद्धचा लढा हा ऋषीमुनींच्या धार्मिक कार्यात हस्तक्षेप करणाऱ्या राक्षसांविरुद्धची मोहीम नसून, त्यांच्या पत्नीच्या अपहरणामुळे उद्भवलेला एक वैयक्तिक संघर्ष म्हणून दाखवण्यात आला आहे, असंही बजरंग यांनी म्हटलंय.

विश्व हिंदू परिषदेचा (VHP) आरोप आहे की, हा चित्रपट रामायणातील रावणाचं पात्र, स्त्रियांप्रति त्याचं वर्तन आणि देवी पार्वतीबद्दलच्या त्याच्या भावनांकडे दुर्लक्ष करून, त्याला शोषित म्हणून चित्रित करण्याचा प्रयत्न करतो. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनीही चित्रपटाबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की, संघटनेनं नुकताच प्रदर्शित झालेला ‘रामायण’ चित्रपट पाहिला आहे. आलोक कुमार म्हणाले, ‘हे बदल नाट्यमयता वाढवण्यासाठी किंवा सिनेमॅटिक परिणाम साधण्यासाठी केलेले नाहीत. चुकीच्या गोष्टी दाखवून दिशाभूल करण्याचा हेतू यातून दिसून येत आहे.’

चित्रपटात रावणाला सहानुभूतीपूर्वक चित्रित केलं आहे, तर त्याचं चारित्र्य, स्त्रियांप्रति त्याचे वर्तन आणि देवी पार्वतीबद्दलचे त्याचे विचार याकडे दुर्लक्ष केलं आहे. आलोक कुमार यांच्या मते, रावणाच्या बहिणीचं नाक कापल्याचा बदला म्हणून सीतेच्या अपहरणाचं समर्थन करण्याचा प्रयत्न चित्रपटात केला आहे. त्यांनी असाही आरोप केला की, रावणाला शोषित, वंचित आणि दलित समाजाचा रक्षक म्हणून चित्रित केलं आहे.

रामायण ही केवळ एक धार्मिक कथा नाही, तर समाजाला आदर्श आणि मूल्ये शिकवणारा एक ग्रंथ आहे. त्यामुळे, विश्व हिंदू परिषदेनं चित्रपटाचं सेन्सॉर प्रमाणपत्र रद्द करण्याची आणि त्याच्या प्रदर्शनावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे. संघटनेनं स्पष्टपणे म्हटलं आहे की, रामायणासारख्या ग्रंथात अशी छेडछाड करणं खपवून घेतलं जाणार नाही.

Follow Us
देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोल....
Delhi Toll : देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोलनाक्यांवर नवी MLFF प्रणाली सुरू
चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त....
Kartiki Ekadashi : चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी वारकऱ्यांची प्रार्थना
कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील..
Beed Farmer Issue : कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील शेतकरी संकटात
लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी
Latur Water Issue : लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी आणण्याच्या मुद्द्यावरून जुंपली
छगन भुजबळ आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर; ओतूरच्या अधिवेशनात राजकीय चर्चा
Chhagan Bhujbal-Amol Kolhe : छगन भुजबळ आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर; ओतूरच्या अधिवेशनात राजकीय चर्चांना उधाण
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, भाजपचा...
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, पत्रकार परिषद घेऊन भाजपचा मोठा दावा
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला...
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला; PM मोदींबाबतही मोठा दावा!
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती...
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती, दिल्ली कोर्टात महत्त्वाची सुनावणी
रायगडच्या राजकारणात ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा...
रायगडच्या राजकारणात वादा ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा, म्हणाले 'उलटी गिनती सुरू'
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा...
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय