AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FIFA World Cup 2026 : फुटबॉल वर्ल्ड कप मध्ये धक्कादायक निकालाची नोंद, दिग्गज टीम ब्राझील OUT

FIFA World Cup 2026 : सध्या फिफा वर्ल्ड कप 2026 टुर्नामेंट सुरु आहे. पृथ्वीवरचा सर्वात लोकप्रिय खेळ कोणता असेल तर तो फुटबॉल आहे. या फुटबॉलमध्ये जगातील लोकप्रिय संघांमध्ये ब्राझीलची गणना होते. रोनाल्डो, पेले असा एकापेक्षा एक दिग्गज फुटबॉलपटू ब्राझीलने जगाला दिले आहेत.

FIFA World Cup 2026 : फुटबॉल वर्ल्ड कप मध्ये धक्कादायक निकालाची नोंद, दिग्गज टीम ब्राझील OUT
FIFA World Cup 2026 Image Credit source: Justin Setterfield/Getty Images
| Updated on: Jul 06, 2026 | 8:51 AM
Share

Brazil vs Norway : पाचवेळचा वर्ल्ड कप विजेता दिग्गज संघ ब्राझीलचं फिफा वर्ल्ड कप 2026 टुर्नामेंटमधील आव्हान संपुष्टात आलय. नार्वेने ब्राझीलला पराभूत करुन क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. राऊंड ऑफ 16 साठी झालेल्या लढतीत नार्वेने ब्राझीलला 2-1 ने हरवलं. ब्राझीलने शेवटचा वर्ल्ड कप 2002 मध्ये जिंकला होता. या पराभवामुळे वर्ल्ड कप विजयाची ब्राझीलची प्रतिक्षा अजून लांबली आहे. ब्राझील विरुद्ध नार्वे सामन्यात सर्वांच लक्ष नेमार आणि एर्लिंग हालँड यांच्यावर होतं. दोघेही आपपाल्या टीमचे स्टार खेळाडू आहेत. ब्राझीलच्या सर्व अपेक्षा नेमारवर होत्या तर हालँडकडून नॉर्वेला अपेक्षा होत्या. महत्वाचं म्हणजे याच दोन खेळाडूंच्या गोलने सामन्याचा निकाल लागला.

या मॅचमध्ये पहिले दोन्ही गोल नॉर्वेने केले. त्यातून ब्राझीलने सावरण्याचा प्रयत्न केला पण तो पर्यंत खूप उशीर झालेला. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नाही. दुसऱ्या हाफमध्ये एर्लिंग हालँडने नॉर्वेकडून पहिला गोल डागला. हालँडला सामन्याच्या 79 व्या मिनिटला पहिला गोल करण्यात यश मिळालं. त्यानंतर 90 व्या मिनिटाला हालँडनेच दुसरा गोल केला. नॉर्वेच्या या दोन गोलमुळे ब्राझीलची टीम पूर्णपणे बॅकफूटवर ढकलली गेली.

ब्राझीलने कधी कधी वर्ल्ड कप जिंकलाय?

एक्स्ट्रा टाइममध्ये नेमारला ब्राझीलकडून गोल करण्यात यश आलं. पण नॉर्वेची 2-1 आघाडी तो कमी करु शकला नाही. नॉर्वेच्या टीमने या विजयासह राऊंड ऑफ 16 म्हणजे क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. फुटबॉलमधल्या यशस्वी संघांमध्ये ब्राझीलची गणना होते. 1958, 1962, 1970, 1994 आणि 2002 असं पाचवेळा ब्राझीलने फुटबॉल वर्ल्ड कप जिंकला आहे.

7 वेळा नॉकआऊटमध्ये ब्राझील अपयशी

2002 साली शेवटचा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर 7 वेळा नॉकआऊट म्हणजे बाद फेरीच्या सामन्यात ब्राझीलला युरोपियन टीमकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता नॉर्वे याआधी 2022 साली क्वार्टर फायनलमध्ये क्रोएशिया, 2018 क्वार्टर फायनलमध्ये बेल्जियम, 2014 साली जर्मनी, 2010 साली नेदरलँडस आणि 2006 क्वार्टर फायनलमध्ये फ्रान्सने हरवलं. भारतातही ब्राझीलचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. अर्जेंटिना आणि ब्राझील हे भारतातील दोन लोकप्रिय संघ आहेत.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...