AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर ज्याची भीती तेच घडलं… 27 आणि 28 तारखेला अख्ख्या देशात लॉकडाऊन, पाकिस्तान नव्हे या देशात अराजक

शेख हसीनांच्या मायदेशी परतण्याच्या घोषणेनंतर बांगलादेशात राजकीय अशांतता वाढली आहे. आवामी लीगने २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी देशव्यापी लॉकडाऊन पुकारला असून हिंसक निदर्शने सुरू आहेत. शेख हसीनांवरील गुन्हे मागे घेणे, पक्षबंदी उठवणे, महागाई नियंत्रण आणि नागरिकांच्या संरक्षणासह अनेक मागण्या आवामी लीगने सरकारसमोर ठेवल्या आहेत.

अखेर ज्याची भीती तेच घडलं... 27 आणि 28 तारखेला अख्ख्या देशात लॉकडाऊन, पाकिस्तान नव्हे या देशात अराजक
bangladesh protestImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 25, 2026 | 10:07 AM
Share

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना मायदेशी येणार असल्याची घोषणा होताच बांगलादेशात हिंसा भडकली आहे. आवामी लीगने तर 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. शेख हसीना आणि पक्षाच्या नेत्यांच्या विरोधातील गुन्हे मागे घेण्याची आणि पक्षावरील बंदी उठवण्यासहीत अनेक मागण्या आवामी लीगने केल्या आहेत. तसेच शेख हसीना समर्थक रस्त्यावर उतरून हिंसा करत आहेत. देशात अराजक सुरू असल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण बसरलं आहे.

आवामी लीगने मंगळवारी बांगलादेशात मोठी रॅली काढली होती. तसेच आज देशभर हिंसक आंदोलन करण्याची घोषणाही केली आहे. शेख हसीना परत येत असल्याने आवामी लीगने आंदोलन छेडलं आहे. शेख हसीना या 16 डिसेंबर रोजी बांगलादेशाच्या मुक्तीसंग्रामाच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून मायदेशी परतणार आहे. त्यामुळे बांगलादेशात तणाव वाढण्याची शक्यता आहे.

शेख हसीना मायदेशी परतणार असल्याचं कळताच जमात ए इस्लामीचे प्रमुख शफीकुर्रहमान यांनी ऑस्ट्रेलिया-मलेशियाचा दौरा आटोपता घेतला आहे. शेख हसीना यांची वापसी आणि बांगलादेशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शफीकुर्रहमान हे पंतप्रधान तारिक रहमान यांच्याशी चर्चा करणार आहेत. याच दरम्यान, आवामी लीगनेही आपल्या काही प्रमुख मागण्या सरकार समोर ठेवल्या आहेत.

आवामी लीगच्या मागण्या

शेख हसीना आणि पक्षाच्या नेत्यांच्या विरोधातील गुन्हे मागे घ्यावेत. तसेच राजकीय हेतूने प्रेरित निर्णय रद्द करावा.

आवामी लीगवरील बंदी उठवावी. पार्टी नेते आणि कार्यकर्त्यांना कार्यक्रमाची परवानगी द्यावी.

राजकीय बंदिवानांची सुटका करण्यात यावी. त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत

बांगलादेशातील वाढत्या महागाईला नियंत्रणात ठेवा. वीज, गॅस, पाणी, इंधन आणि खाद्यपदार्थांसह आवश्यक वस्तुंच्या किंमती कमी करा.

बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरू करा. बेरोजागर आणि श्रमिकांना रोजगार द्या.

नागरिकांचं संरक्षण झालं पाहिजे. हत्या, बलात्कार, खंडणी, लुटमारी आणि बेकायदेशील रित्या जमिनी बळकावणं तसेच महिला, मुलं आणि अल्पसंख्यांकांचे संरक्षण करा.

सैन्य, नागरिक अधिकारी तसेच पत्रकारांवरील खोटे गुन्हे मागे ग्या. अभिव्यक्ती आणि प्रेसचं स्वातंत्र्य बहाल करा.

दहशतवादाविरोधात कारवाई करा. तुरुंगातून सोडून देण्यात आलेल्या दहशतवाद्यांना अटक करा.

देश होरपळतोय

बांगलादेशातील हिंसा थांबण्याचं नाव घेत नाहीये. शेख हसीना यांच्या जिल्ह्यातच आवामी लीगच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला. गोपालगंजमध्ये अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली. गोपालगंजमध्ये 12 दुकानांची तोडफोड केली गेली आहे. क्रिकेट स्टेडियमजवळील फुलांच्या दुकानांवरही हल्ला करण्यात आला आहे.

Follow Us
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चावरून सुप्रिया सुळे नाराज? विश्वासात...
Rohit Pawar : रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चावरून सुप्रिया सुळे नाराज? विश्वासात घेतले नाही, पत्रकार परिषदेत फोटोही नव्हता- सूत्र
नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवार...
Chandrashekhar Bawankule : नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी
Rohit Pawar : रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी काय रणनीती ठरली?
रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्य
Pune : रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्यावर 20 वर्षीय तरुणाला जीवदान
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं
Aditya Thackearay : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं; नेमकं कारण काय?
शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह..
Shivsena : शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज युक्तिवाद
ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील...
Rohit Pawar Tractor Morcha : ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील चर्चांना पुन्हा उधाण
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी