AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेतन्याहू यांचे भारताबद्दलचे विधान ऐकताच तळपायाची आग जाईल मस्तकाला, थेट भारताला…

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबले आहे. मात्र, आता इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात संबंध ताणले आहेत. त्यामध्येच आता इस्त्रायलने भारताचे नाव घेत एक धक्कादाक विधान केले. ज्याने मोठी खळबळ उडाली.

नेतन्याहू यांचे भारताबद्दलचे विधान ऐकताच तळपायाची आग जाईल मस्तकाला, थेट भारताला...
netanyahu benjamin
| Updated on: Jul 06, 2026 | 12:22 PM
Share

अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून इराणवर हल्ला केला. जवळपास 3 महिने हे युद्ध सुरू होते. आता हे युद्ध थांबले आहे. मात्र, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात काही गोष्टींवरून मतभेद झाल्याचे दिसतंय. नुकताच इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेला भारताचे नाव घेत मोठा आरसा दाखवला. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस यांच्या दाव्याला खोटा सांगितले. इस्त्रायलचा समर्थक फक्त वॉशिंग्टनच नाही तर इतरही देश असल्याचे त्यांनी म्हटले. इराण आणि अमेरिकेत सुरू असलेले युद्धविराम करार यामुळे दोन्ही देशातील संबंध ताणले आहेत. इस्त्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी नुकताच बोलताना भारताच्या समर्थनाबद्दल मोठे विधान केले. मात्र, यादरम्यानच त्यांनी भारताबद्दल वादग्रस्त विधान केले. भारताचे नाव घेत त्यांनी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस यांना थेट उत्तर दिले.

बेंजामिन नेतन्याहू यांनी फॉक्स न्यूज संडे ब्रीफिंगला बोलताना म्हटले की, इस्त्रायलचे अनेक देशांनी समर्थन केले. ज्यात भारत देखील आहे. भारत हा एक छोटा देश आहे. आमचे काही मित्र आहेत, त्यामध्ये भारतासारखा छोटा देशही आहे. तुम्हाला माहिती आहे का? तिथे 1.4 अरब लोक राहतात. खरे सांगू तर आम्हाला तिथून जबरदस्त समर्थन मिळाले आहे. मात्र, यादरम्यान बोलताना त्यांनी वारंवार भारताला छोटा देश असल्याचे म्हटले.

नेतन्याहू यांनी भारताला छोटा देश असल्याचे म्हटल्याने भारतीय लोकांना हे अजिबात पटले नाही. भारता हा जगातील मोठी अर्थव्यवस्था आहे. भारता अजिबात छोटा देश नसल्याने भारतीयांचे म्हणणे आहे. नेतन्याहू यांना भारत छोटा देश का दिसतो, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. भारतीय लोक नेतन्याहू यांच्या या विधानानंतर संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस यांनी व्हाईट हाऊसमधील एका ब्रिफिंगंध्ये बोलताना म्हटले होते की, इस्त्रायलने अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेचा सन्मान केला पाहिजे. ज्यानंतर इस्त्रायल नेते नाराज झाले. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविराम शांतता करारावर इस्त्रायल नाराज आहे. यावर एका इस्त्रायलच्या नेत्याने बोलताना म्हटले देखील होते की, मी जर इस्त्रायलच्या कॅबिनेटमध्ये नसतो तर मी यावर जोरदार टीका केली असतील.

अमेरिका आणि इस्त्रायल चांगले मित्र देश आहेत. मात्र, इराणसोबतच्या युद्धात त्यांचे संबंध ताणल्याचे बघायला मिळतंय. इस्त्रायलचे प्रधानमंत्री नेतन्याहू यांनी भारताबद्दल पुढे बोलताना म्हटले की, मला फेसबुकवर भारताचे समर्थन मिळत आहे. मात्र, नेतन्याहू यांनी भारताबद्दल केलेले भाष्य लोकांना अजिबात वाढत नाही. नेतन्याहू कायमच भारत जवळचा मित्र असल्याचे सांगतात. मात्र, आता त्यांनीच भारताबद्दल हे विधान केले.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ