AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : आठवड्याच्या सुरुवातीलाच मोठा दिलासा, सोनं स्वस्त; जाणून घ्या आजचे १० ग्रॅमचे दर

Gold Price Today 6 July 2026 Latest News Updates in Marathi : गेल्या आठवड्यात २४-कॅरेट सोन्याच्या दरात २,७८० रुपयांची, तर २२-कॅरेट सोन्याच्या दरात २,५५० रुपयांची वाढ झाली. जेपी मॉर्गनच्या मते, या वर्षी सोन्याचे भाव वाढणार असले तरी ही वाढ मर्यादित असेल. मात्र आज, सोमवारी, देशांतर्गत २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याचे भाव किती, ते जाणून घेऊया..

Gold Price Today : आठवड्याच्या सुरुवातीलाच मोठा दिलासा, सोनं स्वस्त; जाणून घ्या आजचे १० ग्रॅमचे दर
6 जुलै रोज सोन्याचे आणि चांदीचे भाव किती ?
| Updated on: Jul 06, 2026 | 8:49 AM
Share

गेल्या आठवड्यात वाढणाऱ्या दरांनी भर पावसात घाम फोडल्यानंतर , नव्या आठवड्यात मात्र सोन्यामुळे वाढलेलं टेन्शन कमी झालंय. देशात सोन्याचे भाव पुन्हा एकदा कमी झाले आहेत. सोमवार, 6 जुलै रोजी सकाळी देशातील बहुतांश शहरांमध्ये २४-कॅरेट आणि २२-कॅरेट सोन्याचे दर घसरले. राजधानी दिल्लीत २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४६,८७० रुपयांपर्यंत खाली आला आहे. मात्र गेल्या आठवड्यात २४-कॅरेट सोन्याच्या दरात २,७८० रुपयांची आणि २२-कॅरेट सोन्याच्या दरात २,५५० रुपयांची वाढ झाली होती. आज आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट गोल्ड’चा भाव प्रति औंस ४,१७५.०२ डॉलर्स इतका आहे.

जेपीमॉर्गनच्या मते, या वर्षी सोन्याच्या किमतीत वाढ होणार असली तरी ती मर्यादित असेल. यामागचं प्रमुख कारण म्हणजे प्रमुख क्षेत्रांकडून सोन्याची मागणी अपेक्षेइतकी जोरदार नसेल. तिसऱ्या तिमाहीत सोन्याचे भाव प्रति औंस ४,३०० डॉलर्स आणि चौथ्या तिमाहीत प्रति औंस ४,५०० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

देशांतील काही प्रमुख शहरांमधील सोन्याचे भाव

देशाची राजधानी दिल्लीत २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४६,८७० रुपये आहे. तर २२-कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमसाठी आज १,३४,६४० रुपये मोजावे लागतील. तर आर्थिक राजधानी मुंबई तसेच कोलकाता येथे २२-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,३४,४९० रुपये असून २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४६,७२० रुपये इतका आहे.

देशांतील प्रमुख शहरांपैकी चेन्नईत सोन्याचा भाव सर्वाधित आहे. तिथे २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४९,४५० रुपये इतका आहे. तर २२-कॅरेट सोन्यासाठी तिथे १,३४,५४० रुपये इतका दरा मोजावा लागतो. पुणे आणि बंगळुरूचेही दर समोर आले आहेत. या दोन्ही शहरांमध्ये २४-कॅरेटचं १० ग्रॅम सोनं हे १,४६,७२० रुपयांना आणि २२-कॅरेट १० ग्रॅम सोनं हे १,३४,४९० रुपयांना मिळत आहे.

शहर 22 कॅरेट सोन्याचा आजचा दर (₹) 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर (₹)
दिल्ली 134640 146870
मुंबई 134490 146720
अहमदाबाद 134810 146770
चेन्नई 134540 149450
कोलकाता 134490 146720
हैदराबाद 134490 146720
जयपुर 134640 146870
भोपाल 134540 146770
लखनऊ 134640 146870
चंडीगढ़ 134640 146870

चांदीची किंमत

सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या दराही घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. ६ जुलैच्या सकाळी चांदीचा दर प्रति किलो २,४९,९०० रुपये इतका असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठवड्यात या दरात १०,००० रुपयांची वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट’ चांदीचा दर प्रति औंस ६२.४७ डॉलर्स इतका आहे. सोने आणि चांदीचे देशांतर्गत दर हे देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही घटकांमुळे प्रभावित होतात.

Follow Us
ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय...
Devendra Fadnavis | ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय घडलं?
राजकीय हालचालींना वेग! ठाकरे गटातील अंबादास दानवेंचं फडणवीसांना पत्र
राजकीय हालचालींना वेग! ठाकरे गटातील अंबादास दानवेंचं थेट CM फडणवीसांना पत्र, अचानक...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय काय घडतंय?
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल