Watermelon Health Benefits : कलिंगड खाण्याचे 6 आश्चर्यकारक फायदे!

| Updated on: Jul 16, 2021 | 10:22 AM

कलिंगडमध्ये सुमारे 90% पाणी असते, जे आपल्याला हायड्रेटेड आणि ताजे ठेवते. कलिंगड खाण्याचे देखील चवदार असते. कलिंगडमध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील असतात.

Watermelon Health Benefits : कलिंगड खाण्याचे 6 आश्चर्यकारक फायदे!
कलिंगड
Follow us on

मुंबई : कलिंगडमध्ये सुमारे 90% पाणी असते, जे आपल्याला हायड्रेटेड आणि ताजे ठेवते. कलिंगड खाण्यासाठी देखील चवदार असते. कलिंगडमध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर अनेक पौष्टिक पदार्थ आहे. कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे आणि कॅलरीचे प्रमाण कमी असते. त्यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए असते. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. (6 important benefits of eating watermelon)

रक्तदाब नियंत्रित करते – कलिंगडमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. त्यात लाइकोपीन सारख्या अँटीऑक्सिडंट्स असतात. ते हृदयरोगापासून संरक्षण करू शकतात. कलिंगडमध्ये कॅरोटीनोईड असतात, जे रक्तदाब, हृदयविकाराचा झटक्याचा धोका कमी करतात.

आपले शरीर हायड्रेटेड ठेवते – कलिंगडमध्ये 90% पाणी असते. हे हायड्रेटेड राहण्यास मदत करते. कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे. हे शरीराला उष्णतेपासून वाचविण्यात मदत करते. कलिंगड तुमचे शरीर थंड ठेवते. कलिंगडमध्ये कॅलरी खूप कमी असतात.

वेगाने वजन कमी होते – कलिंगड एक गोड आणि रसाळ फळ आहे. त्यात कॅलरी कमी असते. म्हणून, वजन कमी करण्यासाठी आपण आपल्या आहारात कलिंगड देखील समाविष्ट करू शकता. ते आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करते.

हृदयविकाराचा झटका – आजकाल मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे हृदयविकाराचा झटका आहे. निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून ही समस्या सोडविली जाऊ शकते. कलिंगडमध्ये असलेले पोषक घटक हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. कलिंगडमध्ये लाइकोपीन असते, जे रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

पचन सुधारते – कलिंगडमध्ये फायबर असते, जे निरोगी पाचक प्रणालीसाठी आवश्यक असते. फायबरयुक्त फळे आणि भाज्या खाणे खूप उपयुक्त ठरू शकते. ते तुमची पाचक प्रणाली सुधारण्यासाठी कार्य करतात.

किडनी स्टोनच्या त्रासातून मुक्तता – ज्यांना मूत्रपिंडात स्टोनची समस्या आहे, त्यांनी भरपूर कलिंगड खावे. कलिंगडमध्ये जास्त प्रमाणात पाणी आहे आणि यामुळे आपल्या मूत्रपिंडालाही डीटॉक्स करण्यात कलिंगड मदत करते.

संबंधित बातम्या : 

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(6 important benefits of eating watermelon)