Beetroot Raita Recipe : घरच्या-घरी तयार करा बीटचा रायता, पाहा खास रेसिपी!

| Updated on: Sep 24, 2021 | 1:05 PM

रायता हा आपल्या आहारातील अविभाज्य घटक आहे. जेवनामध्ये रायता नसल्यास जेवण पूर्ण वाटत नाही. जास्त करून आपण दह्याचा रायता खातो. आज आम्ही तुम्हाला खास बीटचा रायता कसा तयार करायचा हे सांगणार आहोत. बीट हे आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

Beetroot Raita Recipe : घरच्या-घरी तयार करा बीटचा रायता, पाहा खास रेसिपी!
रायता
Follow us on

मुंबई : रायता हा आपल्या आहारातील अविभाज्य घटक आहे. जेवणामध्ये रायता नसल्यास जेवण पूर्ण वाटत नाही. जास्त करून आपण दह्याचा रायता खातो. आज आम्ही तुम्हाला खास बीटचा रायता कसा तयार करायचा हे सांगणार आहोत. बीट हे आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळेच आपण दररोजच्या आहारामध्ये बीट रायत्याचा समावेश केला पाहिजे. (Beetroot Raita is beneficial for health)

बीट रायत्यासाठी साहित्य

बीट – 2 चिरलेले

तिखट मसाला – 3/4 टीस्पून

आवश्यकतेनुसार मीठ

भाजलेले जिरे पावडर – 3/4 टीस्पून

दही – 3 कप

स्टोप – 1 बीट मऊ होईपर्यंत शिजवा. बीट रायता बनवण्यासाठी बीट वाफेवर शिजवा किंवा ते खूप मऊ होईपर्यंत उकळा. बीट शिजल्यानंतर त्याचे साल काढा.

स्टोप – 2 दहीमध्ये मसाले आणि शिजवलेले बीट मिक्स करा. यानंतर दही एका मिक्सिंग बाऊलमध्ये घ्या. त्यात भाजलेले जिरे पूड, तिखट आणि मीठ घाला. दही गुळगुळीत होईपर्यंत आणि मसाल्यांचा समावेश होईपर्यंत साहित्य चांगले मिसळा. आता दहीमध्ये बीट घालून चांगले मिक्स करा. तुम्हाला दिसेल की गुलाबी रंगाचे दही तयार होत आहे. रायता थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा.पुदिन्याच्या पानांनी सजवा. थंडगार सर्व्ह करा आणि आनंद घ्या.

बीटचे आरोग्य फायदे

बीट रक्तदाब नियंत्रणात ठेवते. यामध्ये पोटॅशियम भरपूर असते, जे शरीरातील पोटॅशियमची कमतरता दूर करते. पोटॅशियमच्या कमतरतेमुळे शरीरात थकवा आणि अशक्तपणा यासारख्या समस्या निर्माण होतात. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढली तरी तुम्ही बीटचा रस घेऊ शकता. बीट शरीरातील रक्त वाढवण्याचे काम देखील करते.

बीटाचा रस उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतो. संशोधकांना असे आढळून आले आहे की, जे लोक दररोज एक कप बीटाचा रस पितात त्यांच्यात सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रक्तदाब कमी असतो. बीटाच्या रसामध्ये नायट्रेट असते जे रक्तप्रवाह सुरळीत करते. ज्यामुळे रक्तदाब कमी होतो.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Beetroot Raita is beneficial for health)