Carrot Juice Benefits : गाजराचा रस पिण्याचे हे 5 आश्चर्यकारक फायदे वाचा!

| Updated on: Oct 27, 2021 | 7:22 AM

गाजर (Carrot) अतिशय पौष्टिक आहे. हे केवळ पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी प्रदान करत नाही तर यामध्ये प्रोव्हिटामिन ए देखील मोठ्या प्रमाणात असते. गाजराचा रस पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, डोळ्यांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते.

Carrot Juice Benefits : गाजराचा रस पिण्याचे हे 5 आश्चर्यकारक फायदे वाचा!
carrot juice
Follow us on

मुंबई : गाजर (Carrot) अतिशय पौष्टिक आहे. हे केवळ पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी प्रदान करत नाही तर यामध्ये प्रोव्हिटामिन ए देखील मोठ्या प्रमाणात असते. गाजराचा रस पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, डोळ्यांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. गाजराच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. त्यात क आणि के जीवनसत्त्वे जास्त असतात. त्यात कॅरोटीनोइड्स नावाचे वनस्पती घटक देखील असतात. जे अँटिऑक्सिडंट्स म्हणून कार्य करतात. गाजराच्या रसातील मुख्य कॅरोटीनॉइड बीटा-कॅरोटीन आहे.

डोळ्यांसाठी फायदेशीर

डोळ्यांच्या आरोग्यासाठी अ जीवनसत्व आवश्यक आहे. प्रोविटामिन ए साठी आपण अनेक फळे आणि भाज्या खाऊ शकतो. यामुळे अंधत्व आणि वय-संबंधित डोळ्यांच्या आजारांचा धोका कमी होतो. याशिवाय गाजराचा रस ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनचा चांगला स्रोत आहे. ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन युक्त आहार घेतल्यास डोळ्यांच्या समस्यांचा धोका कमी होतो.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी

गाजराच्या रसामध्ये आढळणारे व्हिटॅमिन ए आणि सी हे दोन्ही अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतात. या दोन्हीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. ते मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून आपले संरक्षण करतात. हा रस व्हिटॅमिन बी 6 चा समृद्ध स्रोत आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही या रसाचा आहारात समावेश करू शकता.

कर्करोगविरोधी प्रभाव

काही अभ्यासानुसार, गाजराच्या रसामध्ये असे काही घटक आहेत. जे कर्करोगापासून बचाव करू शकतात. गाजरात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. हे कर्करोगाच्या पेशींना प्रतिबंध करण्यास मदत करते. यामध्ये असलेले कॅरोटीनॉइड अॅसिड महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करते.

रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी

गाजराचा रस थोड्या प्रमाणात प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. अभ्यासनुसार गाजरमध्ये अँथोसायनिन्स असतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

त्वचेसाठी गाजराचा रस

गाजराचा रस व्हिटॅमिन सी आणि बीटा-कॅरोटीन प्रदान करतो. दोन अँटिऑक्सिडंट्स जे तुमच्या त्वचेला नुकसान होण्यापासून वाचवू शकतात. कोलेजनच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन सी देखील आवश्यक आहे, ज्यामुळे त्वचा निरोगी होते.

संबंधित बातम्या :

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

(Carrot Juice is extremely beneficial for health)