
Father’s Day 2025 साजरा करण्याची वेळ जवळ आली आहे. आपल्या आयुष्यात वडिलांचे योगदान अमूल्य असते. त्यांच्या कष्टाचा आणि प्रेमाचा सन्मान करण्यासाठी हा खास दिवस साजरा केला जातो. यावर्षी वडिलांसाठी खास गिफ्ट म्हणून त्यांच्या आवडीचा केक घरच्या घरी बनवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. यासाठी तीन अतिशय सोप्या आणि स्वादिष्ट केक रेसिपी आम्ही घेऊन आलो आहोत.
साहित्य :
कृती : सर्वप्रथम मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ मिक्स करा. दुसऱ्या भांड्यात साखर व तेल एकत्र फेटा. त्यात वरील मैद्याचं मिश्रण टाका आणि त्यात वनीला एसेंस व दूध मिसळा. घोल नीट फेटून केक मोल्डमध्ये ओतून 180 डिग्री प्रीहीट ओव्हनमध्ये 25 मिनिटे बेक करा. दुसरीकडे व्हीपिंग क्रीममध्ये डार्क चॉकलेट, थोडं गरम दूध आणि बटर घालून चॉकलेट पेस्ट तयार करा. बेक झाल्यावर केक थंड करून त्यात क्रीम, साखर सिरप व डेकोरेशन करून सर्व्ह करा.
साहित्य :
कृती : सर्व साहित्य एकत्र करून मिक्स करा. मग कप मध्ये घालून 180 डिग्री प्रीहीट ओव्हनमध्ये 25 मिनिटे बेक करा. थंड झाल्यावर क्रीमने डेकोरेशन करा आणि आपल्या पप्पांना सर्व्ह करा.
साहित्य :
कृती : मैदा आणि बेकिंग पावडर मिक्स करून त्यात मीठ, साखर, मक्खन, पाणी, वनीला एसेंस आणि दही टाका व नीट फेटा. तयार मिश्रण ग्रीस केलेल्या टिनमध्ये ओता. प्रेशर कुकरमध्ये 3-4 मिनिटे प्रीहीट करून त्यात केक ठेवून 30 मिनिटे लो फ्लेमवर बेक करा. थंड झाल्यावर सर्व्ह करा.