Chaat Masala Recipe : ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा खास चाट मसाला!

| Updated on: Nov 10, 2021 | 10:00 AM

चाट मसाला हे मसाला पावडरचे मिश्रण आहे. जे सामान्यतः प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात आढळते. या मसाल्याच्या पावडरचा वापर आपल्या घरांमध्ये भाज्या, करी आणि सलाडमध्ये केला जातो. चाट मसाला बाजारात सहज उपलब्ध आहे. मात्र, जेवणाची चव वाढवण्यासाठी तुम्ही स्वतःचा चाट मसाला घरीही बनवू शकता.

Chaat Masala Recipe : या पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा खास चाट मसाला!
चाट मसाला
Follow us on

मुंबई : चाट मसाला हे मसाला पावडरचे मिश्रण आहे. जे सामान्यतः प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात आढळते. या मसाल्याच्या पावडरचा वापर आपल्या घरांमध्ये भाज्या, करी आणि सलाडमध्ये केला जातो. चाट मसाला बाजारात सहज उपलब्ध आहे. मात्र, जेवणाची चव वाढवण्यासाठी तुम्ही स्वतःचा चाट मसाला घरीही बनवू शकता. चला जाणून घेऊया त्याची रेसिपी.

चाट मसाल्याचे साहित्य

जिरे – 1/4 कप

धणे – 2 टीस्पून

काळी मिरी – 1 टीस्पून

काळे मीठ – 2 टीस्पून

हिंग – 1/2 टीस्पून

वाळलेल्या कैरी पावडर – 1/4 कप

पांढरे मीठ – 1 टीस्पून

चाट मसाला घरी कसा बनवायचा?

स्टेप – 1

कढईत धणे, जिरे घालून सुगंध येऊपर्यंत भाजून घ्या.

स्टेप – 2

आचेवरून काढून ग्राइंडरमध्ये ठेवा.

स्टेप – 3

यानंतर काळी मिरी ग्राइंडरमध्ये टाकून पावडर बनवा.

स्टेप – 4

पावडर एका भांड्यात काढून त्यात हिंग, कैरीची पूड, काळे मीठ आणि पांढरे मीठ टाका. ते चांगले मिसळा.

स्टेप – 5

एका काचेच्या डब्यात, चाट मसाला ठेवा आणि थंड आणि कोरड्या जागी ठेवा.

स्टेप – 6

हा घरगुती चाट मसाला 2-3 महिने वापरता येतो.

चाट मसाल्याचे फायदे

जिऱ्यामध्ये कॅलरीज कमी असतात. हे वजन कमी करण्यास आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. जिरे चयापचय वाढवण्यास देखील मदत करते. हे शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास देखील मदत करते. जिऱ्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, तांबे आणि मॅंगनीज असते जे चमकदार त्वचेसाठी खूप महत्वाचे आहे.

धने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करण्यास मदत करतात. हे संक्रमण आणि इतर अनेक रोग होण्यापासून प्रतिबंधित करते. धन्यामध्ये असे गुणधर्म आहेत. जे तुमची पचनसंस्था निरोगी ठेवतात. तसेच पचनाशी संबंधित अनेक आजार बरे होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

(Chaat Masala Extremely beneficial for health)