AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight loss : सब्जा आणि दह्याच्या स्मूदीचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते!

दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात. त्यात फॉस्फरस आणि कॅल्शियम इत्यादी पोषक घटक असतात. त्यामुळे दात आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. दही हा एक उत्तम प्रोबायोटिक पदार्थ आहे. दही हे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. नियमित सेवनाने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.

Weight loss : सब्जा आणि दह्याच्या स्मूदीचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते!
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 24, 2022 | 12:13 PM
Share

मुंबई : वजन कमी (Weight loss) करण्यासाठी दररोज व्यायामासोबतच चांगला आहारही खूप महत्त्वाचा आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, स्मूदी आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर (Beneficial) असते. दही आणि सब्जा मिक्स करून तयार केलेली स्मूदी (Smoothie) खूप जास्त फायदेशीर असते. नाश्त्यामध्ये याचा समावेश करू शकता. ही एक अतिशय चवदार आणि निरोगी स्मूदी आहे. हे बनवणे खूप सोपे आहे. तुम्ही हा आरोग्यदायी नाश्ता घेऊ शकता. हे दही, सब्जा, सफरचंद यापासून तयार करता येते.

स्मूदी तयार करण्याची पध्दत-

1 वाटी दही, 6 चमचे भिजवलेला सब्जा, कापलेले सफरचंद आणि काही द्राक्षे घ्या. ही स्मूदी बनवायला तुम्हाला फक्त 10 मिनिटे लागतील. प्रथम एका भांड्यात दही टाका, त्यात भिजवलेला सब्जा टाका, अर्धे चिरलेले सफरचंद आणि थोडी द्राक्षे घाला, नीट मिक्स करा. अशाप्रकारे आपली खास स्मूदी तयार आहे. आता थंड होण्यासाठी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा आणि सेवन करा. दहीचे आरोग्य फायदे

दही

दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात. त्यात फॉस्फरस आणि कॅल्शियम इत्यादी पोषक घटक असतात. त्यामुळे दात आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. दही हा एक उत्तम प्रोबायोटिक पदार्थ आहे. दही हे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. नियमित सेवनाने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो, हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते, पचनसंस्था निरोगी राहते. यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये दह्याचा नक्कीच समावेश करा.

सब्जा

सब्जामध्ये फायबर, खनिजे, प्रथिने आढळतात. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हा प्रोटीनचा खूप चांगला स्रोत आहे. त्यामुळे शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर होण्यास मदत होते. त्यात कॅल्शियम असते. त्यामुळे हाडे मजबूत होतात. यामध्ये फायबर असते. ते स्मरणशक्तीसाठी खूप चांगले असतात. याच्या सेवनाने स्मरणशक्ती सुधारते. विशेष म्हणजे सब्जाचे सेवन केल्याने आपले पोट देखील बऱ्याचवेळ भरलेले राहते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Hair | मऊ आणि चमकदार केस मिळवण्यासाठी हे 3 हेअर मास्क केसांसाठी अत्यंत फायदेशीर!

Vegetable : ‘या’ भाज्यांचा आहारामध्ये समावेश करा आणि निरोगी जीवन जगा!

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी