Anjeer Kheer Recipe : घरच्या-घरी तयार करा खास अंजीरची खीर, जाणून घ्या रेसिपी!

| Updated on: Nov 23, 2021 | 6:35 AM

अंजीर हे एक सुपर ड्राय फ्रूट्स आहे. हे सहसा रात्रभर भिजवले जाते आणि नंतर खाल्ले जाते. हे झिंक, मॅंगनीज, मॅग्नेशियम आणि लोह सारखे अनेक पोषक पुरवते. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, के, कॅल्शियम, पोटॅशियम, कॉपर तसेच अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म जास्त प्रमाणात असतात.

Anjeer Kheer Recipe : घरच्या-घरी तयार करा खास अंजीरची खीर, जाणून घ्या रेसिपी!
अंजीरची खीर
Follow us on

मुंबई : अंजीर हे एक सुपर ड्राय फ्रूट्स आहे. हे सहसा रात्रभर भिजवले जाते आणि नंतर खाल्ले जाते. हे झिंक, मॅंगनीज, मॅग्नेशियम आणि लोह सारखे अनेक पोषक पुरवते. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, के, कॅल्शियम, पोटॅशियम, कॉपर तसेच अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म जास्त प्रमाणात असतात. अंजीरमध्ये देखील भरपूर फायबर असते. सुकलेले अंजीर प्रजनन आरोग्य सुधारू शकते. रक्तदाब कमी करू शकतो आणि हाडे मजबूत करू शकतो. यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये अंजीरचा समावेश केला पाहिजे.

अंजीरची खीर आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अंजीरची खीर तयार करण्यासाठी दूध, तांदूळ, बदाम, अंजीर, साखर, तूप आणि केशर लागेल. ही खीर तुम्ही सण आणि विशेष प्रसंगी बनवू शकता. ही खीर बनवायला खूप सोपी आहे आणि ती लवकर तयार होते. लहान मुलं असोत की मोठी, सगळ्यांना ही रेसिपी नक्कीच आवडेल. चला तर जाणून घेऊयात ही खीर घरी कशी तयार करायची.

अंजीरच्या खीरचे साहित्य

दूध – 1 लिटर

भिजवलेले, चिरलेले बदाम – 10

केशर

साखर – 5 टीस्पून

तूप – 1 टीस्पून

तांदूळ – 4 टीस्पून

वाळलेल्या अंजीर – 12

अंजीरची खीर तयार करण्याची पध्दत-

स्टेप – 1

कढईत तूप गरम करा. आता त्यात चिरलेले बदाम घालून एक मिनिट परतून घ्या. आता धुतलेले तांदूळ घालून दोन मिनिटे परतून घ्या.

स्टेप – 2

आता पॅनमध्ये दूध घाला आणि केशर मिक्स करा. मंद आचेवर गरम होईद्या आणि दुधाला उकळी येऊ द्या.

स्टेप – 3

अंजीर बारीक कापून काही वेळ पाण्यात भिजवा. आता पाणी काढून टाका आणि अंजीर ब्लेंडरमध्ये टाका. 2 चमचे पाणी घालून पेस्ट बनवा.

स्टेप – 4

आता दुधात अंजीराची पेस्ट घालून मिक्स करा. त्यात गुठळ्या नाहीत याची खात्री करा. मिश्रण 10 मिनिटे मंद आचेवर उकळू द्या. आता साखर घालून मिक्स करा आणि ढवळत राहा.

स्टेप – 5

अंजीरची खीर तयार आहे. आता त्यावर काजूने सजवून सर्व्ह करा.

अंजीरचे फायदे-

अंजीरमध्ये झिंक, मॅंगनीज, मॅग्नेशियम, लोह यासारखे पोषक घटक असतात. अंजीर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करते. यात प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि सल्फर सारखे गुणधर्म असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच थकवा आणि अशक्तपणा दूर राहतो.

अंजीरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. जे आपल्या शरीरात साखरेची पातळी नियंत्रित करते. बर्‍याच अभ्यासांमध्ये असे आढळले आहे की, अंजीरमध्ये क्लोरोजेनिक अॅसिड साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. भिजवलेले अंजीर खाण्यामुळे टाइप -2 मधुमेहात रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर नियंत्रण मिळते.

संबंधित बातम्या : 

Skin Care | नितळ-निरोगी त्वचेसाठी दररोज वापरा ‘ब्युटी ऑईल’, जाणून घ्या याचे फायदे…

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक