AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाने नाक कापलं, ऑस्ट्रेलिया विरुद्ध फायनलमध्ये 185 धावांनी धुव्वा

Australia vs India Women 3rd Odi Match Result : एलिसा हीली आणि बेथ मुनी या जोडीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 400 पार मजल मारलसी. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताला झटपट रोखून विजयी हॅट्रिक पूर्ण केली.

IND vs AUS : वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाने नाक कापलं, ऑस्ट्रेलिया विरुद्ध फायनलमध्ये 185 धावांनी धुव्वा
Deepti Sharma WIND vs AUSImage Credit source: Bcci
| Updated on: Mar 01, 2026 | 6:03 PM
Share

भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 चा आयसीसी वनडे वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला. भारतीय महिला संघाची आयसीसीचा कोणताही वर्ल्ड कप जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. त्यानंतर भारतीय महिला संघाने अवघ्या काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऐतिहासिक कामगिरी केली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या आणि अंतिम टी 20I सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. भारताने यासह ही 3 सामन्यांची टी 20I मालिका 2-1 ने जिंकली. वूमन्स टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाच्या भूमित कोणतीही आंतरराष्ट्रीय मालिका जिंकण्याची पहिलीच वेळ ठरली. मात्र त्यानंतर टीम इंडियाने घोर निराशा केली.

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर सलग 2 एकदिवसीय सामन्यांत मात केली. ऑस्ट्रेलियाने यासह 3 सामन्यांची मालिका आपल्या नावावर केली. त्यामुळे वूमन्स टीम इंडिया तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन विजयी हॅट्रिक करण्यापासून रोखणार का? याकडे भारतीय समर्थकांचं बारीक लक्ष लागून होतं. मात्र या सामन्यात तर टीम इंडियाने नाक कापलं. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारताचा 185 धावांनी धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाने यासह ही मालिका 3-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली आणि भारताचा व्हाईट वॉश केलं.

सामन्यात काय झालं?

ऑस्ट्रेलियाने पहिले 2 क्रिकेट सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली होती. त्यामुळे यजमानांसाठी या अंतिम सामन्यात तसा दबाव नव्हता. त्यामुळे कांगारुंना कोणताही लोड न घेता या सामन्यात कमाल केली. कांगारुंनी 50 ओव्हरमध्ये 400 पार मजल मारली. ऑस्ट्रेलियाने भारताच्या गोलंदाजांची धुलाई करत 7 विकेट्स गमावून 409 रन्स केल्या.

कॅप्टन एलिसा हीलीची दीडशतकी खेळी

ऑस्ट्रेलियासाठी दोघींनी शतक केलं. कर्णधार एलिसा हीली हीने तिच्या निरोपाच्या सामन्यात दीडशतकी खेळी केली. ओपनर आणि कर्णधार अशी दुहेरी भूमिका बजावणाऱ्या हीलीने 98 बॉलमध्ये 158 रन्स केल्या. बेथ मुनी हीने नाबाद 106 धावांची खेळी केली. जॉर्जिया वॉल हीने 62 धावांचं योगदान दिलं. तर निकोला कॅरी हीने नाबाद 34 रन्स केल्या. तसेच इतरांनीही योगदान दिलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला धावांचा डोंगर उभारता आला.

आता टीम इंडियाची महिला ब्रिगेड या धावांचा पाठलाग करताना कशी कामगिरी करते याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर भारताला 50 षटकंही खेळता आलं नाही. ऑस्ट्रेलियाने भारताला 45.1 ओव्हरमध्ये 224 धावांवर गुंडाळलं.

भारताकडून या हायस्कोरिंग सामन्यात एकीलाही अर्धशतक करता आलं नाही. भारतासाठी स्नेह राणा हीने 44 तर जेमिमाह रॉड्रिग्स हीने 42 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना 40 धावांपर्यंतही पोहचता आलं नाही. ऑस्ट्रेलियासाठी अलाना किंग हीने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. जॉर्जिया वॉरहम हीने दोघींना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत ऑस्ट्रेलियाला तिसरा सामना जिंकून देण्यात योगदान दिलं.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार