Weight loss | वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी या 4 पेयांचा आहारात समावेश करा आणि फरक पाहा! 

| Updated on: May 24, 2022 | 3:42 PM

दालचिनी हा एक मसाला आहे जो संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत करतो. हा मसाला रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करतो. खराब कोलेस्ट्रॉलची पातळी आणि चरबी बर्न मदत करते. 1 चमचे मध 1 चमचे दालचिनी पावडरसह मिसळून एक ग्लास पाण्यामध्ये गरम करा, त्यानंतर पाणी कोमट झाल्यावर प्या. यामुळे शरीरावरील अतिरिक्त चरबी बर्न होण्यास मदत होते.

Weight loss | वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी या 4 पेयांचा आहारात समावेश करा आणि फरक पाहा! 
Follow us on

मुंबई : सध्याच्या जीवनशैलीत (Lifestyle) वाढलेल्या वजनाची अनेकांना मोठी चिंता आहे. कारण वाढलेल्या वजनामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. मधुमेह, कोलेस्टेरॉल, युरिक ऍसिड यांसारख्या समस्यांना लठ्ठपणामुळेच होतात. अनेकदा ताणामुळे वजन वाढते. डॉक्टर नेहमीच वजन कमी (Weight loss) करण्याचा सल्ला देतात. कारण वजन नियंत्रणात असेल तर शरीर निरोगी राहते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे वजन कमी असेल तर अनेक रोग आपल्यापासून दूर राहतात. पण वजन कमी करताना आहार आणि व्यायामाचा (Exercise) महत्वाचा आहे. डाएट आणि व्यायामाने अनेकजण आपला जीव धोक्यात घालण्याची चूक करतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी काही आरोग्यदायी मार्ग निवडा. ज्यामुळे तुमचे वजनही कमी होईल आणि तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.

गरम पाणी प्या

आयुर्वेद गरम पाणी पिण्याची शिफारस करतो. आयुर्वेदामध्ये गरम पाण्याला अमृत मानले जाते आणि ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. सकाळी कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्या. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. पचनसंस्था निरोगी झाली की, वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. यामुळेच दररोज सकाळी कोमट पाण्याने लिंबू मिक्स करून पिणे खूप फायदेशीर आहे

हे सुद्धा वाचा

दालचिनी

दालचिनी हा एक मसाला आहे जो संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत करतो. हा मसाला रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करतो. खराब कोलेस्ट्रॉलची पातळी आणि चरबी बर्न मदत करते. 1 चमचे मध 1 चमचे दालचिनी पावडरसह मिसळून एक ग्लास पाण्यामध्ये गरम करा, त्यानंतर पाणी कोमट झाल्यावर प्या. यामुळे शरीरावरील अतिरिक्त चरबी बर्न होण्यास मदत होते.

ग्रीन टी

ग्रीन टी आपल्या केसांसाठी, त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. ग्रीन टीच्या मदतीने आपण आरोग्याच्या अनेक समस्या दूर करू शकतो. तसेच ग्रीन टीही वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. काही दिवस ग्रीन टीचा आहारात समावेश करा आणि बघा आपले वजन कसे झपाट्याने कमी होते. तसेच ही ग्रीन टी त्वचेच्या देखील अनेक समस्या दूर करण्यास मदत करते.

मध

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, मध आपल्या आरोग्यासाठी किती जास्त फायदेशीर आहे. मधामुळे पोटीवरील चरबी म्हणजेच बेली फॅट कमी होण्यास मदत होते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी रोज सकाळी कोमट पाण्यात मध मिसळून प्या. यामुळे वजन कमी होईल, तसेच शरीरही निरोगी राहील. मात्र, मध जेंव्हा तुम्ही पाण्यामध्ये मिसळता, तेंव्हा नेहमीच पाणी हे कोमट असावे.