Food : उपमा तयार करताना ‘या’ खास टिप्स फाॅलो करा, पाहा रेसिपी!

| Updated on: Oct 13, 2021 | 10:01 AM

शरीरात ऊर्जा टिकवण्यासाठी जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक तत्वे आवश्यक असतात. या सर्व गोष्टी व्यक्तीला रव्यातून सहज मिळतात . साधारणपणे लोक इडली, उपमा वगैरे बनवून रवा खातात. उपमा हे अतिशय पौष्टिक आणि हलके अन्न मानले जाते. त्यात भाज्या घालून ते अधिक फायदेशीर ठरते.

Food : उपमा तयार करताना या खास टिप्स फाॅलो करा, पाहा रेसिपी!
उपमा
Follow us on

मुंबई : शरीरात ऊर्जा टिकवण्यासाठी जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक तत्वे आवश्यक असतात. या सर्व गोष्टी व्यक्तीला रव्यातून सहज मिळतात . साधारणपणे लोक इडली, उपमा वगैरे बनवून रवा खातात. उपमा हे अतिशय पौष्टिक आणि हलके अन्न मानले जाते. त्यात भाज्या घालून ते अधिक फायदेशीर ठरते. पण बरेच लोक तक्रार करतात की उपमा चिकट होतो त्यामुळे ते खाऊ शकत नाहीत. मात्र, आपण काही खास टिप्स फाॅलो करून कोरड्या उपमा तयार करू शकतो.

साहित्य-

एक वाटी रवा, एक कांदा चिरलेला, दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, दोन चमचे उडदाची डाळ, एक चमचा तळलेले शेंगदाणे, अर्धा चमचा किसलेले आले, अर्धा कप सोललेले आणि चिरलेले गाजर, अर्धा कप मटार, अर्धा चमचा मोहरी, 5 ते 6 कढीपत्ता, अर्धा कप शिमला मिरची, अर्धे लिंबू, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, आवश्यकतेनुसार तेल.

तयार करण्याची पध्दत-

-रवा एका कढईत घ्या आणि हलका भाजून घ्या आणि बाहेर काढा. हिरवे वाटाणे पाण्यात उकळा. त्यानंतर कढईत तेल टाकून गरम करा. यानंतर मोहरी आणि कढीपत्ता घाला. तसेच उडीद डाळ घाला. फोडणीनंतर कांदा आणि आले घाला.

-कांदा सोनेरी होऊ द्या. यानंतर हिरवी मिरची, उकडलेले मटार, गाजर, शिमला मिरची आणि चवीनुसार मीठ घालून पॅन झाकून भाज्या शिजवा. भाज्या शिजल्यावर त्यात भाजलेला रवा घालून सर्वकाही मिक्स करा.

-यानंतर तुम्ही उपम्यात जे पाणी टाकणार आहात ते गरम करून टाका. रव्यामध्ये गरम पाणी घाला आणि ते उकळूद्या. एक ते दोन मिनिटे शिजवा. लक्षात ठेवा उपम्यामध्ये कधीही थंड पाणी मिक्स करू नका. या चुकीमुळे रवा चिकटतो. उपमा शिजल्यावर त्यात अर्धा लिंबू पिळून कोथिंबीरीने सजवा आणि सर्वांना गरमागरम सर्व्ह करा.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Follow these special tips when upma)