AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips | शरीरातील ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठी आहारात सामील करा ‘हे’ घटक, लवकर दिसून येतील फायदे!

कोरोना विषाणूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि याची लागण आपल्याला होऊन नये म्हणून सगळेच लोक खबरदारीचा उपाय अर्थात ‘इम्युनिटी’ वाढवण्यासाठी आहारात आवश्यक ते बदल करत आहेत.

Health Tips | शरीरातील ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठी आहारात सामील करा ‘हे’ घटक, लवकर दिसून येतील फायदे!
ऑक्सिजन लेव्हल
| Updated on: May 06, 2021 | 1:12 PM
Share

मुंबई : कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona Second Wave) दिवसेंदिवस अतिशय घातक ठरत आहे. तसेच ही दुसरी लाट अतिशय विध्वसंक ठरत आहे. बुधवारी (5 मे) कोरोना विषाणूच्या आकडेवारीचे सर्व जुने विक्रम मोडले गेले आहेत. बुधवारी भारतात 4,12,262 नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आणि 3980 लोक एकाच दिवशी मरण पावले आहेत. देशात दररोज लाखो नवीन रुग्ण वाढत आहेत. यामुळे आरोग्य सुविधांना देखील प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. देशातील बर्‍याच मोठ्या शहरांमध्ये ऑक्सिजनची तीव्र कमतरता भासत आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आणि ऑक्सिजनच्या अभावामुळे बर्‍याच कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. यावरून देशभरातील कोरोना स्थितीच्या भीषणतेचा अंदाज बांधला जाऊ शकतो (Health Tips to boost Oxygen level during corona Pandemic).

अशावेळी या विषाणू पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि याची लागण आपल्याला होऊन नये म्हणून सगळेच लोक खबरदारीचा उपाय अर्थात ‘इम्युनिटी’ वाढवण्यासाठी आहारात आवश्यक ते बदल करत आहेत. मात्र, शरीरातील ऑक्सिजन पातळी संतुलित राखण्यासाठी देखील आहारात आपण काही विशिष्ट घटक सामील करू शकता.

ऑक्सिजनची पातळी संतुलित राखण्यासाठी आहार महत्त्वाचा

कोरोना विषाणू आपल्या फुफ्फुसांवर हल्ला करणारे आहेत, ज्यामुळे श्वास घेण्यात त्रास होतो आणि वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध नसल्यामुळे मरण पावणारे रुग्ण यांची संख्या वाढत आहे. कोरोना टाळण्यासाठी ऑक्सिजनची पातळी नियमितपणे राखणे फार महत्वाचे आहे. शरीरात ऑक्सिजनची पातळी संतुलित राखण्यासाठी आपण आपल्या अन्नावरही विशेष लक्ष दिले पाहिजे. चला तर, जाणून घेऊया अशाच काही पदार्थांबद्दल, जे आपल्या आहारात समाविष्ट करून आपण ऑक्सिजनची पातळी संतुलित राखू शकता. हे पदार्थ आपल्या शरीराची ऑक्सिजन पातळी योग्य राखण्यासाठी खूप उपयुक्त आहेत (Health Tips to boost Oxygen level during corona Pandemic.

आहारात ‘हे’ घटक नक्की सामील करा!

1) शरीरातील ऑक्सिजनची पातळी नियमित राखण्यासाठी पाण्याची सर्वात महत्वाची भूमिका असते. म्हणून दिवसभर जास्तीत जास्त पिण्याचा प्रयत्न करा.

2) सोयाबीन आणि अक्रोड आपल्या शरीरात केवळ ऑक्सिजनची पातळी वाढवतच नाही, तर ती टिकवून ठेवण्यासाठीही उपयुक्त ठरतात.

3) कोरोनाचे हे संकट पाहता, शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण नियमित राखणे फार महत्वाचे आहे. बाजारात सहजपणे उपलब्ध असणाऱ्या ब्रोकोली आणि कॅप्सिकममुळे ऑक्सिजनची पातळी वाढते. आपल्या आहारात या भाज्यांचे जास्तीत जास्त सेवन करण्याचा प्रयत्न करा.

4) ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी, आपल्या आहारात गाजर आणि सोयाबीनचा देखील समावेश करा. हे घटक आपल्या शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ देत नाहीत.

5) शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी ही फळे नियमित सेवन करा. ही फळे अनेक गुणांनी परिपूर्ण आहेत, जी या संकट काळात आपल्याला सुरक्षित ठेवू शकतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Health Tips to boost Oxygen level during corona Pandemic)

हेही वाचा :

Beauty Tips : तजेलदार आणि कोमल त्वचेसाठी बदामाचे तेल फायदेशीर !

Health tips : कोरोना रुग्णांनो ‘या’ गोष्टी आहारातून टाळा, अन्यथा रोगप्रतिकारक शक्तीवर होईल परिणाम

Follow Us
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.