Mustard Oil : ‘मोहरीचे तेल’ सांधेदुखीसह अनेक समस्यांवर अत्यंत गुणकारी, वाचा!

| Updated on: Jun 30, 2021 | 1:10 PM

मोहरीचे तेल मुख्यत: स्वयंपाक घरामध्ये आढळते. मोहरीचे तेल गरम असते. हे केवळ अन्नालाच चवदार बनवत नाही तर त्याचे बरेच फायदे देखील आहेत.

Mustard Oil : ‘मोहरीचे तेल’ सांधेदुखीसह अनेक समस्यांवर अत्यंत गुणकारी, वाचा!
सणासुदीच्या काळात मोहरी तेलाचे भाव वाढले
Follow us on

मुंबई : मोहरीचे तेल मुख्यत: स्वयंपाक घरामध्ये आढळते. मोहरीचे तेल गरम असते. हे केवळ अन्नालाच चवदार बनवत नाही तर त्याचे बरेच फायदे देखील आहेत. विशेष म्हणजे केसांसाठी मोहरीचे तेल अतिशय फायदेशीर आहे. मोहरीच्या बियांचे त्वचेसाठी देखील अनेक फायदे आहेत. मोहरीतील बीटाकेरोटिन, आयरन, फॅटी अॅसिड, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या घटकामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यात मदत करते. (Mustard oil is extremely beneficial for health)

सांधेदुखी आणि स्नायू दुखणे कमी करण्यासाठी – आपण मालिशसाठी मोहरीचे तेल वापरू शकता. यासाठी, आपल्याला मोहरीच्या तेलात 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घालाव्या लागतील आणि गरम करावे लागेल. यानंतर, आपण या तेलाने पाय आणि सांधे मालिश करू शकता. हे स्नायूंना बळकट करण्यासाठी कार्य करते. यामुळे वेदनापासून आराम मिळतो.

दातदुखी दूर करण्यासाठी – दातदुखीसाठी मोहरीचे तेल फायदेशीर आहे. दातदुखी दूर करण्यासाठी तुम्ही मोहरीच्या तेलात मीठ मिसळून दात घासू शकता. यामुळे दातदुखीमध्ये आराम मिळतो. यामुळे दात पांढरे आणि मजबूत बनतात. मीठ आणि हळद एकत्र करून तुम्ही मोहरीच्या तेलाची मालिश करू शकता. यामुळे हिरड्यांमधील सूज कमी होण्यास मदत होते.

अँटी-मायक्रोबियल गुणधर्म – मोहरीचे तेल विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंची वाढ थांबवू शकते आणि त्याचा पुढील संसर्ग रोखण्यास सक्षम आहे. म्हणून, याचा उपयोग शरीरावर किंवा अप्रत्यक्षपणे केला जाऊ शकतो, तो दोन्ही प्रकरणांमध्ये फायदेशीर आहे.

केसांसाठी फायदेशीर – मोहरीचे तेल केसांची समस्या दूर करण्यास मदत करते. मोहरीच्या तेलाचा वापर केस गळणे कमी करण्यासाठी आणि केसांच्या समस्या दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. केस धुण्यापूर्वी आपण मोहरीच्या तेलाने मालिश करू शकता. आपण आठवड्यातून तीन वेळा तेलाने मालिश करू शकता. हे केस वाढण्यास मदत करते. त्यात अँटीफंगल आणि अँटीबैक्टीरियल गुणधर्म आहेत.

त्वचेसाठी फायदेशीर – मोहरीच्या बियांनी त्वसेस चकाकी येते. मोहरीच्या त्वचा ग्लोईंग करता येते. मोहरीचे तेल त्वचेस तरूण राखण्यास मदत करते. ड्राय स्किन असल्यास मोहरीच्या बीया चांगला उपाय मानला जातो. मोहरीच्या बियांमध्ये सल्फर तसेच, अँटी फंगल हे घटक असल्याने चेहऱ्यावर होणाऱ्या इनफेक्शनला दूर ठेवण्यासाठी लाभदायक ठरते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

(Mustard oil is extremely beneficial for health)