Potato Juice Benefits | बटाट्याच्या रसाचे अनेक आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या…

| Updated on: Nov 09, 2021 | 11:53 AM

बटाट्याच्या रसाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यात ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस आणि तांबे भरपूर प्रमाणात असतात. हे केवळ प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करत नाही तर, इतर अनेक आरोग्य फायदे देखील आहेत.

Potato Juice Benefits | बटाट्याच्या रसाचे अनेक आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या...
Potato Juice
Follow us on

मुंबई : बटाट्याच्या रसाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यात ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस आणि तांबे भरपूर प्रमाणात असतात. हे केवळ प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करत नाही तर, इतर अनेक आरोग्य फायदे देखील आहेत.

याशिवाय बटाट्याचा रस नियमित घेतल्याने त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते. चला जाणून, घेऊया त्याचे आरोग्य फायदे आणि तुम्ही बटाट्याचा रस घरी कसा बनवू शकता.

बटाट्याचा रस कसा तयार करायचा?

4 मध्यम आकाराचे बटाटे सोलून घ्या, लहान चौकोनी तुकडे करा. आता ते ज्युसरमध्ये टाका आणि ताजा रस काढा आणि तो ताजा सर्व्ह करा. कोणत्याही चवीशिवाय ते कच्चे प्यावा, असा सल्ला दिला जातो.

प्रतिकारशक्ती वाढवते

या रसात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे सर्दी आणि संक्रमणाशी लढण्यास मदत करते. तसेच, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रिकाम्या पोटी एक ग्लास बटाट्याचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो.

संधिरोगावर फायदेशीर

बटाट्याचा रस त्याच्या दाहक-विरोधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो, जो संधिवात आणि इतर सांधे संबंधित समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतो. तज्ज्ञांच्या मते, बटाट्याचे तुकडे दुखणाऱ्या भागावर लावल्यानेही फायदा होतो.

अल्सर पासून आराम देतो

बटाट्याचा रस गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या मते, बटाट्याचा रस सकाळी नियमित सेवन केल्यास अल्सरवर उपचार करण्यास मदत होते.

यकृतासाठी चांगले

हे डिटॉक्स ड्रिंक म्हणून देखील कार्य करते, जे यकृत आणि पित्ताशय स्वच्छ करते. अभ्यासानुसार, जपानमध्ये हिपॅटायटीसवर उपचार करण्यासाठी बटाट्याचा रस देखील वापरला जातो.

कोलेस्ट्रॉल कमी करते

बटाट्याच्या रसात भरपूर फायबर आणि जीवनसत्त्वे ए, बी-कॉम्प्लेक्स आणि सी असतात. तज्ज्ञांच्या मते, हे पोषक घटक मिळून शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून शरीराला ऊर्जावान ठेवण्यास मदत करतात.

बद्धकोष्ठता बरी करते

यामध्ये भरपूर फायबर असते जे, पचनसंस्थेला साफ करण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

कर्करोगाचा धोका कमी करते

एका अभ्यासानुसार, बटाट्याचे नियमित सेवन कर्करोगाच्या पेशींच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. त्यामध्ये ग्लायकोआल्कलॉइड नावाचे रासायनिक घटक असतात, ज्यामध्ये ट्यूमर विरोधी गुणधर्म असतात आणि कर्करोगाची शक्यता कमी करण्यास मदत करतात.

(टीप : आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी अथवा कोणतेही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

हेही वाचा :

Lunar eclipse | शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण, चंद्र लाल का दिसतो? जाणून घ्या चंद्र ग्रहणाबद्दलच्या खास गोष्टी

Weight Loss | दिवाळीच्या फराळाने वजन वाढलं? डिटॉक्सिफिकेशनच्या विचारत आहात?, जाणून घ्या सोपे मार्ग…

Incompatible food combination | सावधान! या 4 अन्नपदार्थांचे कॉम्बीनेशन खाल तर तब्बेत बिघडलीच म्हणून समजा