Drink : हंगाम कोणताही असो ‘हे’ 5 खास पेय प्या, वाचा याबद्दल अधिक !

| Updated on: Jun 30, 2021 | 12:40 PM

हंगाम कुढल्याही असो शरीराला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे असते. कारण शरीर डिहायड्रेशन झाले तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

Drink : हंगाम कोणताही असो हे 5 खास पेय प्या, वाचा याबद्दल अधिक !
ज्यूस
Follow us on

मुंबई : हंगाम कुढल्याही असो शरीराला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे असते. कारण शरीर डिहायड्रेशन झाले तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. या हंगामात जास्त काळ बाहेर राहिल्यास तुमचे आरोग्य बिघडू शकते. तथापि, या वातावरणात आवश्यक असतानाच बाहेर पडा. आपले शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी काही खास पेय पिली पाहिजेत. ज्यामुळे आपले शरीर डिहायड्रेशन होणार नाही. (These 5 special drinks are beneficial for health)

स्ट्रॉबेरी लाइमॅड

स्ट्रॉबेरी लाइमॅड तयार करण्यासाठी कढईमध्ये 1/3 कप साखर आणि 1/3 कप पाणी मिक्स करून गरम करा. एका भांड्यात तयार शरबतमध्ये 500 ग्रॅम चिरलेली स्ट्रॉबेरी, 20 पुदीना पाने आणि 2 कप थंड पाणी मिक्स करा. फ्रिजमध्ये 2 तास ठेवा आणि थंडगार सर्व्ह करा.

कलिंगडचा रस

ब्लेंडरमध्ये कलिंगड, अर्धा चमचा लिंबाचा रस, पुदीन्याची पाने आणि एक चमचे काळी मिरी पावडर घाला. त्यात 4 ते 5 बर्फाचे तुकडे घाला. एका काचेच्या ग्लासमध्ये घाला आणि सर्व्ह करा.

गाजर आणि बीटचा रस

बीट आणि गाजरचा रस बनवा आणि त्यात थोडासा लिंबाचा रस मिसळा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीरात उपस्थित विषारी पदार्थ काढून टाकते. एका गाजरामध्ये अंदाजे 95 % पाणी असतं. शिवाय एका मध्यम आकाराच्या गाजरात जवळजवळ 25 कॅलरिज असतात. हा रस आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

कांद्याचा रस

आयुर्वेदानुसार बाहेरून आल्यानंतर कांद्याचा रस थोडासा मधात मिसळावा. हे आपल्या शरीराचे तापमान सामान्य करते आणि उष्णतेपासून देखील त्याचे संरक्षण करते.

ताक

हे एक स्फूर्तिदायक पेय आहे जे आपले शरीर थंड ठेवते. यात प्रथिने, प्रोबियटिक्स आणि जीवनसत्त्वे असतात जे शरीराचे तापमान सामान्य ठेवण्यास मदत करतात.

लिंबूयुक्त पाणी

लिंबूयुक्त पाणी प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती सुधारते, परंतु यात साखरेऐवजी गुळ वापरण्याची खबरदारी घेतली पाहिजे. अधिक साखर घालून सेवन केल्याने पोटात आम्लता निर्माण होते. त्यामध्ये उपस्थित पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रित करू शकते. जेव्हा जेव्हा उच्च रक्तदाबाची समस्या जाणवते, तेव्हा एक ग्लास लिंबू पाणी प्यायले पाहिजे.

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

(These 5 special drinks are beneficial for health)