चॉकलेट केकचे चाहते असाल तर जगातील हे 10 केक नक्की जाणून घ्या; चव अशी की पाहताच तोंडाला सुटेल पाणी!

World's Best Chocolate Cakes : चॉकलेट केकचे अनेक प्रकार जगभरात लोकप्रिय आहेत. ऑस्ट्रियाच्या साचर टॉर्टेपासून ते वितळत्या चॉकलेटच्या मोल्टन लावा केकपर्यंत, जाणून घ्या चॉकलेटप्रेमींना भुरळ घालणारे 10 खास केक..

चॉकलेट केकचे चाहते असाल तर जगातील हे 10 केक नक्की जाणून घ्या; चव अशी की पाहताच तोंडाला सुटेल पाणी!
जगातील प्रसिद्ध केक, चॉकलेट केकचे प्रकार
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 27, 2026 | 1:42 AM

चॉकलेट म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. त्यातही मऊसूत स्पंज, क्रीमी चॉकलेट गनाश आणि वरून सजवलेले चॉकलेटचे थर असलेला केक म्हणजे खवय्यांसाठी खास मेजवानीच. वाढदिवस असो, एखादं सेलिब्रेशन किंवा गोड खाण्याची इच्छा, चॉकलेट केकला अनेकांची पसंती मिळते. जगभरात चॉकलेट केकचे वेगवेगळे प्रकार लोकप्रिय आहेत. काही केक त्यांच्या मऊसर पोतासाठी, तर काही चॉकलेटच्या दाट आणि समृद्ध चवीसाठी ओळखले जातात. अशाच काही प्रसिद्ध प्रकारांविषयी जाणून घेऊया.

साचर टॉर्टे

ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथील हा प्रसिद्ध चॉकलेट केक आहे. चॉकलेट स्पंज आणि जॅमचा थर हे त्याचे वैशिष्ट्य असून बाहेरून चॉकलेट ग्लेझ दिले जाते.

Loading...

ब्लॅक फॉरेस्ट केक

जर्मनीतील हा लोकप्रिय केक चॉकलेट स्पंज, क्रीम आणि चेरी यांच्या मिश्रणातून तयार केला जातो. त्याची सजावट आणि वेगळी चव त्याला खास बनवते.

डेव्हिल्स फूड केक

हा केक गडद रंगाचा, मऊ आणि चॉकलेटच्या तीव्र चवीसाठी ओळखला जातो. चॉकलेटची चव आवडणाऱ्यांसाठी हा लोकप्रिय पर्याय आहे.

मिसिसिपी मड केक

अमेरिकेतील हा केक त्याच्या ओलसर, दाट आणि चॉकलेटयुक्त पोतासाठी प्रसिद्ध आहे. काही प्रकारांमध्ये ब्राउनीसारखा पोतही जाणवतो.

जर्मन चॉकलेट केक

नावात जर्मन असले तरी या केकचा उगम अमेरिकेत झाला. चॉकलेट केकच्या थरांमध्ये नारळ आणि पेकान नट्सपासून तयार केलेले मिश्रण वापरले जाते.

फ्लोअरलेस चॉकलेट केक

या केकमध्ये नेहमीच्या केकप्रमाणे गव्हाचे पीठ वापरले जात नाही. त्यामुळे त्याचा पोत दाट आणि चॉकलेटची चव अधिक तीव्र असते.

चॉकलेट फज केक

चॉकलेट फज केक मऊ, ओलसर आणि भरपूर चॉकलेटच्या चवीसाठी ओळखला जातो. त्यावर गनाश किंवा चॉकलेट आयसिंगचा थर दिला जातो.

ट्रफल केक

चॉकलेट स्पंज आणि गनाशच्या थरांमुळे ट्रफल केकला क्रीमी पोत मिळतो. वाढदिवस आणि खास प्रसंगांसाठी हा लोकप्रिय पर्याय आहे.

मोल्टन लावा केक

या केकच्या बाहेरील भागावर हलका थर असतो, तर आतमध्ये गरम आणि वितळलेले चॉकलेट असते. कापताच बाहेर येणारे चॉकलेट हे त्याचे मुख्य आकर्षण आहे.

चॉकलेट मूस केक

चॉकलेट मूसमुळे हा केक हलका, मऊ आणि क्रीमी लागतो. चॉकलेटची समृद्ध चव आणि मऊ पोत यामुळे तो अनेकांना आवडतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us