कुकरमध्ये भात शिजवताय, तर किती शिट्ट्या लागतात? तांदूळ आणि पाण्याचं योग्य प्रमाण घ्या जाणून
अनेक जण भात टोपात शिजवतात, तर अनेक जण कुकरमध्ये... पण कुकरमध्ये भात शिजवताना अनेक समस्या अनेकांच्या पुढे उभ्या राहतात. कारण त्यांना तांदूळ आणि पाण्याचं प्रमाण कळत नाही... तर जाणून घ्या भात शिजवतात, तांदूळ आणि पाण्याचं योग्य प्रमाण...

चपाती, भाकरी असली तरी भात खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही… अशी सवय अनेकांना असते. भारतीय खाद्यसंस्कृतीत भाताला महत्त्वाचं स्थान आहे. अनेकांना भात गरम – गरम खायला आवडतो, त्यामुळे अनेक जण जेवणाच्या थोडावेळ आधी भात शिजवण्यास सुरुवात करतात. काही – कधी जेवण बनवण्याची घाई असते… अशात प्रेशर कुकर हा सर्वोत्तम पर्याय ठरतो… भात शिजवताना योग्य काळजी घेण्याची गरज असते. बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती नसतं. एक छोटीशी चूक किंवा योग्य माहिती नसल्यामुळे प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात मऊ, चिकट किंवा अगदी लगदा होऊ शकतो. म्हणूनच, जर तुम्हाला प्रेशर कुकरमध्ये मऊ भात शिजवायचा असेल, तर तुम्हाला या पद्धती माहित असणे आवश्यक आहे.
प्रेशर कुकरमध्ये भात शिजवण्यासाठी तांदूळ आणि पाण्याचं प्रमाण…
प्रेशर कुकरमध्ये भात व्यवस्थित शिजण्यासाठी, त्यात योग्य प्रमाणात पाणी घालणं खूप महत्त्वाचे आहे. पाणी कमी असल्यास भात चिकट होतो. जास्त झाल्यास तो भांड्याला चिकटतो. पाणी कमी-जास्त झाल्यास समस्या निर्माण होते. म्हणून, प्रेशर कुकरमध्ये भात घालताना मोजमापासाठी ग्लास किंवा वाटीचा वापर करा. उदाहरणार्थ, एक ग्लास भातासाठी दीड ग्लास पाणी घाला. दोन ग्लास भातासाठी तीन ग्लास पाणी घाला. तरच भात व्यवस्थित शिजतो, असं कुकरमध्ये स्वयंपाक करणाऱ्या महिला सांगतात. कुकरमध्ये भात शिजवल्याने लवकर देखील होतो आणि गॅस देखील कमी लागतो.
भात शिजायला किती शिट्ट्या लागतात?
भात शिजायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे कुकरला वारंवार शिट्टी वाजवू नका. जर तुम्ही 3 कप किंवा त्याहून अधिक भात शिजवत असाल, तर गॅसची आच मोठी ठेवा आणि एक शिट्टी झाल्यावर कुकर बंद करा. मात्र, जर तुम्ही 1 किंवा 2 कप भात शिजवत असाल, तर गॅसची आच मध्यम ठेवा आणि एकदा शिट्टी वाजवू द्या. ‘
लक्षात ठेवा, जोपर्यंत प्रेशर पूर्णपणे जात नाही, तोपर्यंत कुकरचं झाकण उघडू नका. यामुळे भात चांगला शिजेल आणि मऊ होईल. लक्षात ठेवा, राईस कुकरमध्ये भात घालण्यापूर्वी तो फक्त दोनदा पाण्याने धुवा. वारंवार धुतल्याने भात मऊ आणि चिकट होण्याची शक्यता वाढते.