Health Tips : चाट खाणे हेल्दी की अनहेल्दी ? काय आहे खरं, तज्ज्ञांकडून जाणून घ्या माहिती

| Updated on: Feb 24, 2023 | 8:15 AM

जगात क्वचितच एखादा असा कोपरा असेल जिथे रस्त्याच्या कडेला खाण्यापिण्याची सोय नसेल. आपल्याकडे दही भल्ला, चाट, पाणीपुरी यासारखे रस्त्यावरील खाद्यपदार्थ खूप प्रसिद्ध आहेत. लोक ते मोठ्या आवडीने खातात.

Health Tips : चाट खाणे हेल्दी की अनहेल्दी ? काय आहे खरं, तज्ज्ञांकडून जाणून घ्या माहिती
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली : जगात असा एखादाच कोपरा असेल जिथे रस्त्याच्या कडेला खाण्यापिण्याची सोय नसेल. घरी केलेलं ताजं अन्न तर आपण सगळे नेहमी खातोच पण स्ट्रीट फूडची (street food) मजा काही औरच असते. तेथील विशिष्ट पदार्थ, त्याची चव, रंग , पोत हे पाहूनच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. भारतातही स्ट्रीट फूड खूप प्रसिद्ध आहे. वडापाव, समोसा, मोमोज,चायनीज अशा अनेक पदार्थांचा (food) लोक आस्वाद घेत असतात. त्यापैकीच आणखी खूप प्रसिद्ध पदार्थ म्हणजे चाट आयटम्स (chaat).. लहान मुलांपासून तरूणांपर्यंत आणि अगदी प्रौढ व्यक्तींनाही चाट खूपच आवडतं.

आंबटगोड चटण्या, शेव, पुरी, बटाटा, वेगेवगळे पदार्थ घालून केलेले हे पदार्थ कधी फस्त होतात कळतही नाही. बऱ्याच लोकांना दही भल्ला, चाट, पाणीपुरी यासारखे रस्त्यावरील पदार्थ खायला खूपचं आवडतं. पण हे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक मानले जातात.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, दरवेळेस बाहेरचे पदार्थ खाणे टाळण्याची किंवा बंद करण्याची गरजच नाही. तुम्हाला चाट खायचे असेल तर कोणतीही भीती अथवा गिल्ट न बाळगता खाऊ शकता. कारण त्यामध्ये आपल्या आहारातील नेहमीचेच पदार्थ वापरलेले असतात. केवळ तेलाचा थोडा कमी वापर करून तुम्ही या चाट आयटम्सचा आनंद लुटू शकता. तुम्ही कोणते पदार्थ खाऊ शकता, ते जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

1) दहीवडा

दहीवडा बनवण्यासाठी उडदाची डाळ पाण्यात भिजवतात, ते तळलेले असले तरी ते वडे पुन्हा पाण्यात भिजवतात, त्यामुळे तेल शोषले जाते. तसेच दह्यामध्ये उच्च प्रथिने आढळतात. पोळी-आमटीपेक्षाही हे आरोग्यदायी असते.

2) पापडी चाट

पापडी चाट मध्येही दह्याचा वापर केला जातो. त्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते. त्यात पापडी, हरभरा आणि किंवा वडा यांचा समावेश होतो. पोषणतज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, हे अजिबात वाईट नाही. एक प्रकारे ते पोळी आणि दह्याचे कॉम्बिनेशन आहे, नाही का ? या डिशमध्ये भरपूर दही असते व विविध चटण्यांनी त्याची चव आणखी वाढते.

3) बेसन किंवा मूगडाळीचे धिरडे

मूग किंवा बेसनाच्या धिरड्यामध्ये थोडी प्रथिने आढळतात. परंतु ते फायबरचा अतिशय समृद्ध स्रोत आहे.

4) पाणीपुरी

बरेचसे लोक हे खाण्यास घाबरतात कारण त्या पुऱ्या तळलेल्या असतात. पण असं नाही. त्यामध्ये पुदीन्याच्या चटणीचे पाणी असते जे अँटी-ऑक्सीडेंट असते. तसेच बटाट्या अथवा उकडलेल्या चण्यांचा (रगडा) त्यात समावेश असतो. हे खायचं असेल तेव्हा सकाळचा ज्यूस किंवा संध्याकाळच्या नाश्त्याची बिस्कीट खाणे टाळा. म्हणजे सोपं होईल.