Weight Loss | वजन कमी करण्यासाठी दूध पिताय? मग जाणून घ्या स्किम्ड की डबल टोन्ड दूध ठरेल फायदेशीर…

| Updated on: Mar 09, 2021 | 12:29 PM

वजन कमी करण्यासाठी सोया आणि बदामाच्या दुधाचे सेवन करणे सामान्य आहे. परंतु, बहुतेक लोक स्किम्ड दुधाबद्दल आणि टोन्ड दुधाबद्दल संभ्रमात असतात की नेमक्या कोणत्या दुधामुळे वजन वाढणार नाही.

Weight Loss | वजन कमी करण्यासाठी दूध पिताय? मग जाणून घ्या स्किम्ड की डबल टोन्ड दूध ठरेल फायदेशीर...
दूध
Follow us on

मुंबई : जेव्हा जेव्हा आपण वजन कमी करण्याबद्दल बोलतो, तेव्हा प्रथम आपण आपल्या आहारातील चरबीयुक्त घटक कमी करतो. मात्र, दूध म्हणजे सर्वात जास्त अधिक चरबीयुक्त पदार्थ. म्हणूनच, आपण आहारात त्या गोष्टी आपल्या समाविष्ट करतो, ज्यामध्ये चरबीचे प्रमाण कमी असण्याबरोबरच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. म्हणूनच लोक आपल्या आहारात टोन्ड दूध, स्किम्ड दूध, सोया आणि बदामांचे दूध देखील समाविष्ट करतात (Know Skimmed or double toned milk which is better for weight loss).

वजन कमी करण्यासाठी सोया आणि बदामाच्या दुधाचे सेवन करणे सामान्य आहे. परंतु, बहुतेक लोक स्किम्ड दुधाबद्दल आणि टोन्ड दुधाबद्दल संभ्रमात असतात की नेमक्या कोणत्या दुधामुळे वजन वाढणार नाही. चला तर जाणून घेऊया की, दूध प्यायल्याने वजन कसे कमी होईल आणि आरोग्यासाठी किती फायदे होती…

स्किम्ड दूध

स्किम्ड दुधामध्ये 0.5 ग्रॅमपेक्षा कमी चरबी असते, तर साखर अजिबात नसते. हे पचनास हलके आहे आणि चरबी रहित असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी वापरले जाते. एका ग्लास व्होल क्रीम दुधात 10 ग्रॅम चरबी असते, तर त्याऐवजी स्किम्ड दुधात 0.2 ग्रॅम चरबी असते. स्किम्ड दुधात कॅल्शियम, प्रथिने, व्हिटामिन डी आणि ए भरपूर प्रमाणात असते (Know Skimmed or double toned milk which is better for weight loss).

डबल टोन्ड दूध

डबल टोन्ड असलेले दूध व्होल क्रीम दूध आणि स्किम्ड दूध एकत्र मिसळून तयार केले जाते. या दुधात चरबी आणि कॅलरी कमी असतात. लोक वजन कमी करण्यासाठी याचा वापर करतात. दुहेरी टोन्ड दुधात 1.5 टक्के चरबी असते आणि ज्यांना हृदयाशी संबंधित आजार आहे, त्यांच्यासाठी हे दूष खूप फायदेशीर आहे. हे दूध चांगले पचते, त्यात व्हिटामिन डी भरपूर प्रमाणात असते आणि ते प्यायल्याने कॅलरी वाढत नाहीत. एक ग्लास डबल टोन्ड दुधामध्ये 114 कॅलरी असतात, तर टोन्ड दुधाच्या एका ग्लासमध्ये 150 ग्रॅम कॅलरी असतात.

वजन कमी करण्यासाठी दोन्ही प्रकारचे दूध फायदेशीर ठरते. चरबी आणि कॅलरीचे प्रमाण दोन्हीमध्ये कमी आहे, परंतु स्किम्ड दूध हे डबल टोन्ड दुधापेक्षा चांगले आहे. त्यात प्रथिनेही जास्त असतात. प्रथिनेमुळे तुम्हाला भूक लागत नाही. परिणामी हे आपले वजन देखील कमी करते.

दूध नाही, दही आपल्यासाठी सर्वोत्तम!

लक्टो बॅसिलस बॅक्टेरिया दह्यामध्ये आढळतात, हा जीवाणू आपल्या आतड्यांमधे चिकटून राहतो आणि पचनाचा वेग वाढवण्याचे काम करतो. यासह, हे आतड्यांमध्ये इतर कोणत्याही प्रकारचे हानिकारक जीवाणू वाढू देत नाही. आपण नियमितपणे दहीचे सेवन केल्यास आपली त्वचा सुंदर आणि निरोगी ठेवण्यात लाक्टो बॅसिलस महत्वाची भूमिका बजावू शकते. म्हणून, आपल्या आहारात प्रोबायोटिक्सचा समावेश करा.

(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Know Skimmed or double toned milk which is better for weight loss)

हेही वाचा :

Diabetes Diet : मधुमेहाचे रुग्णांनी हे फळ खाल्ल्यास होतील फायदे, शुगर नियंत्रणात राहिल