चहाच्या कपाचीही एक्सपायरी डेट असते का? या खुणा दिसल्या तर लगेच बदला

रोज सकाळची चहा-कॉफी ज्या कपातून पिता, त्याकडे तुम्ही शेवटचे कधी लक्ष दिले? या कपांची सुद्धा एक्सपायरी डेट असते का? सिरॅमिक कप केव्हा फेकून द्यावेत, हे येथे वाचा.

चहाच्या कपाचीही एक्सपायरी डेट असते का? या खुणा दिसल्या तर लगेच बदला
चहाच्या कपाचीही एक्सपायरी डेट असते का?
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 30, 2026 | 11:36 AM

प्रत्येक घरी चहा किंवा कॉफीसाठी सिरेमिक म्हणजेच चिनी मातीचे कप मोठ्या प्रमाणात वापरले जातात. आकर्षक रंग, वेगवेगळे डिझाइन आणि टिकाऊपणामुळे एकदा घेतलेला कप अनेक वर्षे वापरला जातो. मात्र, कप पूर्णपणे फुटेपर्यंत किंवा त्याला मोठे नुकसान होईपर्यंत तो बदलण्याची गरज नाही, असे अनेकांना वाटते. प्रत्यक्षात कपावर दिसणाऱ्या काही छोट्या खुणाही तो बदलण्याची वेळ आल्याचे संकेत देऊ शकतात. सतत गरम पेयांचा संपर्क आणि वारंवार होणारी स्वच्छता यामुळे कपाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाहेरून नीट दिसणारा कपही वापरण्यापूर्वी एकदा काळजीपूर्वक तपासणे गरजेचे आहे. कपावर कोणते बदल दिसल्यास तो वापरणे थांबवावे आणि कपाची एक्सपायरी डेट असते का, हेही जाणून घेऊया.

सिरेमिक कपला एक्सपायरी डेट असते का?

सिरेमिक कपला खाद्य पदार्थांप्रमाणे ठरावीक एक्सपायरी डेट नसते. योग्य वापर आणि स्वच्छता राखल्यास ते बराच काळ टिकू शकतात. मात्र, सततचा वापर, गरम पदार्थ, पडणे किंवा धुताना होणारे नुकसान यामुळे कपाची स्थिती खराब होऊ शकते. त्यामुळे फक्त एक्सपायरी डेट नसल्यामुळे कप वर्षानुवर्षे वापरत राहणे योग्य नाही.

Loading...

कपाला बारीक भेगा पडल्या असतील तर…

कपावर अगदी बारीक भेग दिसत असली तरी ती दुर्लक्षित करू नका. सुरुवातीला छोटी दिसणारी ही भेग कालांतराने वाढू शकते आणि गरम चहा किंवा कॉफी ओतताना कप अचानक फुटण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारचा कप वापरणे टाळावे.

तडा गेलेले कप वापरू नका

कपाची कड, तळाचा भाग किंवा हँडल याला कुठेही तडा गेली असेल तर तो कप वापरणे टाळणे योग्य आहे. विशेषतः अशा कपात गरम पेय ओतल्यास तो तुटण्याची शक्यता असते. यामुळे हाताला किंवा तोंडाला दुखापत होऊ शकते. कपावरील डिझाइन किंवा रंगही गरम पेयामुळे फिके पडत असतील, तर तो कप बदलण्याचा विचार करावा.

कपाची स्वच्छता कशी ठेवावी?

सिरेमिक कप वापरल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. कपाच्या आत चहा किंवा कॉफीचे डाग साचू देऊ नयेत. कप वारंवार पडणार नाही किंवा घासला जाणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच अतिशय गरम पेय अचानक कपात ओतणे टाळावे, कारण तापमानातील अचानक बदलामुळे कपाला नुकसान होऊ शकते. तसेच साधारण ६ महिन्यांनी कप बदलावे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us