AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin care Tips : कोम्बुचा चहा त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !

आपल्या सर्वांना निरोगी आणि चमकदार त्वचा हवी असते. यासाठी अनेक प्रकारची उत्पादने देखील वापरली जातात.

Skin care Tips : कोम्बुचा चहा त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !
वजन कमी करण्यासाठी खास पेय
| Updated on: May 22, 2021 | 11:40 AM
Share

मुंबई : आपल्या सर्वांना निरोगी आणि चमकदार त्वचा हवी असते. यासाठी अनेक प्रकारची उत्पादने देखील वापरली जातात. पण त्याचा काही विशेष फायदा होत नाही. जर आपण दररोज आहारात कोम्बुचा चहा घेतला तर आपली त्वचा सुंदर होण्यास मदत होईल. तसेच कोम्बुचा चहा फक्त आपल्या त्वचेसाठीच नाहीतर आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. कोम्बुचा चहा बाजारामध्ये उपलब्ध असतो. यात प्रोबायोटिक्स आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात. चला कोम्बुचा चहा म्हणजे नेमके काय हे जाणून घेऊयात. (kombucha tea is beneficial for the skin)

कोम्बुचा चहा म्हणजे काय कोम्बुचा चहा ब्लॅक आणि ग्रीन टी मिक्स करून केला जातो. या चहामध्ये प्रोबिओटिक्स, व्हिटॅमिन बी, सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे नैसर्गिकरिक्ता त्वचेच्या काळजीसाठी मदत करतात. प्रोबायोटिक्स त्वचेच्या अनेक उत्पादनांमध्ये वापरले जाते. कोम्बुचा वापर क्लीन्सर, मॉइश्चरायझर आणि सीरमसारख्या सौंदर्य उत्पादनांमध्ये केला जातो. हे त्वचेच्या समस्या दूर करण्यात मदत करते.

त्वचा हायड्रेटेड कोम्बुचा चहाचे सेवन पाण्यामध्ये मिक्स करून केले जाते. यामुळे आपली त्वचा हायड्रेटेड राहते. याचा उपयोग केल्याने त्वचा ताजी राहते. काही दिवस आपण आहारामध्ये हा कोम्बुचा चहा घेतलातर आपल्या त्वचेमध्ये बदल जाणवेल.

त्वचेचा टोन सुधारतो हा चहा त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यात अँटीऑक्सिडेंट्सचे प्रमाण जास्त आहे. या चहामध्ये ग्रीन आणि ब्लॅक टीचे सर्व गुणधर्म आहेत. ते पिऊन, त्वचा सुधारते आणि रंग देखील चांगला होतो. यामध्ये एंटीसेप्टिक आणि नॅचरल अॅसिडस् आहेत जे त्वचेचे पीएच संतुलित करण्यास मदत करते.

त्वचेला डिटॉक्सिफाई करते कोम्बुचा चहामध्ये भरपूर व्हिटॅमिन बी गुणधर्म असतात. यात बी -1, बी -2, बी -6 आणि बी -12 जीवनसत्त्वे असतात. हा चहा त्वचेच्या निरोगी पेशी तयार करण्यास मदत करते. हे आपले केसही मजबूत बनवते.

(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

(kombucha tea is beneficial for the skin)

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ