Ladakh Gold: लिंबापेक्षा 10 पट अधिक व्हिटॅमिन सी! 12000 फूट उंचीवर आढळणाऱ्या सूपरफूडची पीयूष गोयल यांनी शेअर केली माहिती

Ladakh Gold: लिंबापेक्षा 10 पट अधिक व्हिटॅमिन सी हे लडाखमधील एका फळात आढळून येते. या सूपरफूडची माहिती स्वत: पीयूष गोयल यांनी शेअर केली आहे

Ladakh Gold: लिंबापेक्षा 10 पट अधिक व्हिटॅमिन सी! 12000 फूट उंचीवर आढळणाऱ्या सूपरफूडची पीयूष गोयल यांनी शेअर केली माहिती
ladakh
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Edited By: | Updated on: Oct 21, 2026 | 1:31 PM

लडाख म्हटले की डोळ्यांसमोर उंच पर्वतरांगा, बर्फाच्छादित डोंगर आणि निसर्गाचे सुंदर दृश्य उभे राहते. मात्र, याच लडाखमध्ये एक खास फळ आढळते, ज्याला ‘लडाख गोल्ड’ म्हणून ओळखले जाते. या फळामध्ये लिंबाच्या तुलनेत तब्बल १० पट अधिक व्हिटॅमिन सी असल्याचा दावा करण्यात आला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनीही सोशल मीडियावर या फळाची माहिती शेअर केली आहे.‘सी बकथॉर्न’ (Sea Buckthorn) असे या फळाचे नाव असून, ते लडाखमधील नुब्रा खोऱ्यात सुमारे १२ हजार फूट उंचीवर आढळते. या फळाला भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅगही मिळाला आहे.

काय आहे सी बकथॉर्न?

Loading...

सी बकथॉर्न हे काटेरी झुडपावर वाढणारे लहान, पिवळसर-नारिंगी रंगाचे फळ आहे. हे झुडूप आशिया आणि युरोपमधील थंड प्रदेशांमध्ये आढळते. लडाखमधील अतिथंड हवामान आणि प्रतिकूल परिस्थितीतही हे झाड तग धरू शकते. या फळाची चव आंबट असते. स्थानिक पातळीवर याला ‘लेह बेरी’ किंवा ‘त्सेस्टा लुलू’ असेही म्हटले जाते. त्याच्या सोनेरी-नारिंगी रंगामुळे त्याला ‘लडाख गोल्ड’ हे नाव मिळाले आहे.

लिंबापेक्षा १० पट अधिक व्हिटॅमिन सी?

सी बकथॉर्न हे व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानले जाते. पीयूष गोयल यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये या फळात लिंबाच्या तुलनेत १० पट अधिक व्हिटॅमिन सी असल्याचा दावा करण्यात आला आहे. एका संशोधन अहवालानुसार, लडाखमध्ये आढळणाऱ्या सी बकथॉर्नमध्ये प्रति १०० ग्रॅम सुमारे २७५ मिलिग्रॅम व्हिटॅमिन सी आढळल्याचे नमूद आहे. मात्र, त्याचे प्रमाण फळाची जात, हवामान आणि वाढीच्या परिस्थितीनुसार बदलू शकते.

कशामुळे मानले जाते सुपरफूड?

सी बकथॉर्नमध्ये व्हिटॅमिन सीसोबत व्हिटॅमिन ई, कॅरोटिनॉइड्स, काही बी जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट घटक आढळतात. हे घटक रोगप्रतिकारक शक्तीचे सामान्य कार्य, त्वचेतील कोलेजन निर्मिती आणि वनस्पतीजन्य पदार्थांमधील लोहाचे शोषण यांसाठी उपयुक्त ठरतात. या फळाच्या बिया आणि गरापासून मिळणाऱ्या तेलामध्येही विविध प्रकारची फॅटी अॅसिड्स असतात.

कसे करावे सेवन?

सी बकथॉर्नची चव आंबट असल्यामुळे अनेक जण हे फळ थेट खाण्याऐवजी त्यापासून तयार केलेल्या पदार्थांचे सेवन करतात. यापासून ज्यूस, फळांचा गर, जॅम आणि विविध पेये तयार केली जातात. तसेच, त्यापासून तेल आणि अर्कही बनवले जातात. या घटकांचा वापर काही ब्युटी प्रोडक्ट्स आणि स्किन केअरसाठी तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांमध्ये केला जातो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us