मद्यप्रेमींचा आवडता चकणा कोणता? ‘या’ 10 रुपयांच्या पदार्थाने मारली बाजी

चकणा म्हणून काय खावे हे मद्यप्रेमींच्या मूडवर अवलंबून असते. मात्र एक असा पदार्थ आहे, जो चकणा म्हणून सर्वाधिक खाल्ला जातो. हा पदार्थ सगळीकडे मिळतो आणि त्याची किंमत फक्त 10 रुपये असते.

मद्यप्रेमींचा आवडता चकणा कोणता? या 10 रुपयांच्या पदार्थाने मारली बाजी
liquor
| Updated on: Jul 18, 2025 | 7:48 PM

दारु पिताना जवळपास सर्वच मद्यप्रेमी चकणा खातात. चकणा म्हणून काय खावे हे मद्यप्रेमींच्या मूडवर अवलंबून असते. मात्र एक असा पदार्थ आहे, जो चकणा म्हणून सर्वाधिक खाल्ला जातो. महत्वाची बाब म्हणजे हा पदार्थ सगळीकडे मिळतो आणि त्याची किंमत फक्त 10 रुपये असते. आज आपण या पदार्थाचे नाव काय आहे आणि देशात त्याचा व्यवसाय किती मोठा आहे याची माहिती जाणून घेणार आहोत.

हा आहे आवडचा चकणा

दारूसोबत चकणा म्हणून अनेकजण पापड, सॅलड, नमकीन खातात. मात्र या सर्वांव्यतिरिक्त दारूसोबत चकणा म्हणून मसालेदार शेंगदाणे हे मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. मद्यप्रेमींची मागणी पाहून अनेक कंपन्यांनी 10 रुपयांच्या पॅकेटमध्ये वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये शेंगदाणे मार्केटमध्ये आणले आहेत. हे शेंगदाणे दारूच्या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात.

भुईमुगाचे सर्वाधिक उत्पादन कुठे होते?

भारताच्या विविध भागात भुईमुगाची शेती केली जाते. मात्र गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात भुईमुगाचे सर्वाधिक उत्पादन होते. भुईमुगाची लागवड खरीप आणि रब्बी हंगामात केली जाते. हे शेतकऱ्यांसाठी एक नगदी पीक आहे. यापासून शेतकऱ्यांना चाराही मिळतो. तसेच शेंगदाण्याची विक्री केली जाते.

हा व्यवसाय किती मोठा?

भारतात पॅकेज्ड स्नॅक फूड मार्केटचा व्यवसाय 40 ते 45 हजार कोटींचा आहे. (शेंगदाणे, नमकीन, भुजिया, चिप्स यात शेंगदाणे आणि त्याच्याशी संबंधित स्नॅक्सचा वाटा (मसाला शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे ) सुमारे 8 ते 10 हजार कोटी रुपयांचा आहे.

हल्दीराम, बिकानेरवाला, बालाजी, हल्दीराम नागपूर, बिकाजी, लेजेंड स्नॅक्स आणि लोकल ब्रँड हे शेंगदाण्याचा व्यवसाय करतात. तसेच काही स्थानिक व्यापारीही शेंगदाण्यांचे लहान पॅकेट बनवतात आणि स्थानिक बाजारात विकतात.

दारु पिताना चकणा का खातात?

दारु पिताना चकणा खाण्याचे कारण म्हणजे, दारु पिताना पोट रिकामं असेल तर दारू फार लवकर रक्तात मिसळते, आणि लगेच झिंग चढते. मात्र चकणा खाल्ल्याने पोटात अन्न राहतं, त्यामुळे दारूचा हळू रक्तात मिसळते आणि झिंग उशिरा येते किंवा सौम्य वाटते. तसेच काही लोक चव आणि आनंद वाढवण्यासाठी चकणा खातात. तिखट, थोडेसे खारट पदार्थ दारूच्या चवेशी चांगले जुळतात. त्यामुळे दारू पिताना चकणा खाल्ल्याने चव वाढते आणि चांगला अनुभव येतो.