
तुमच्या शरीरात एक असा मूक योद्धा आहे जो रात्रंदिवस न थांबता शरीराचं डिटॉक्स करत राहतो, तो म्हणजे यकृत (लिव्हर). पण तुम्ही त्याच्या सुरक्षेसाठी काही करत का? आजच्या काळात जंक फूड, औषधांचा अतिरेक आणि तणाव, हे सगळं सर्वात आधी यकृतावरच परिणाम करतं. अशा वेळी जर तुम्हाला असा नैसर्गिक उपाय मिळाला जो या अनमोल अवयवाची काळजी बिनदुष्परिणाम घेईल, तर कसं वाटेल? आपण बोलतोय एका अत्यंत छोट्या पण गुणकारी फळाबद्दल, ज्याला भूमी आवळा म्हणतात. कदाचित यापूर्वी तुम्ही त्याचं नाव ऐकलं नसेल, पण त्याचे फायदे इतके दमदार आहेत की त्याला यकृताचा ‘बॉडीगार्ड’ म्हणतात.
भूमी आवळा काय आहे?
भूमी आवळा हे एक छोटंसं रोपटं असतं, जे जमिनीच्या जवळ उगवतं आणि त्याची छोटी हिरवी फळं ही साध्या आवळ्यासारखीच दिसतात. त्यामुळेच त्याला “भूमी आवळा” असे म्हणतात, म्हणजे जमिनीवर उगवणारा आवळा. आयुर्वेदात याला “झारफूक” किंवा “भुई आवळा” असेही म्हणतात. यकृत, किडनी आणि पचनाच्या अनेक समस्या दूर करण्यात हे अत्यंत फायदेशीर मानलं जातं.
यकृताचं डिटॉक्स करतं
भूमी आवळ्यात असे नैसर्गिक घटक असतात जे शरीरात साठलेले टॉक्सिन बाहेर काढण्यास मदत करतात. हे यकृताची कार्यक्षमता वाढवतं आणि त्याला पुन्हा नव्याने तयार (रीजनरेट) होण्यास मदत करतं.
हेपेटायटिसमध्ये फायदेशीर
आयुर्वेदात भूमी आंवळ्याचा उपयोग हेपेटायटिस बी आणि सी सारख्या आजारांमध्ये केला जातो. हे यकृतातील सूज कमी करतं आणि व्हायरसशी लढण्यास मदत करतं.
फॅटी लिव्हरमध्ये आराम
आजकाल फॅटी लिव्हर ही सामान्य समस्या झाली आहे. भूमी आवळा यकृतात चरबी साठण्यापासून रोखतं आणि आधीची चरबीही हळूहळू कमी करतं.
इतर आरोग्यदायी फायदे
-रक्तातील साखर नियंत्रित करतं : मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान ठरू शकतं
-रोगप्रतिकारशक्ती वाढवतं : इम्युनिटी मजबूत करतं
-किडनी स्टोनमध्ये आराम : लघवीच्या मार्गाने छोटे दगड बाहेर टाकण्यास मदत करतं
कसं घ्यावं?
-भूमी आवळ्याचा रस, पावडर किंवा काढा घेता येतो
-सकाळी रिकाम्या पोटी १ चमचा रस पाण्यात मिसळून घ्या
-आजपासूनच हा छोटासा बॉडीगार्ड तुमच्या यकृताला भेटू द्या!
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)